TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बकाले कोणा-कोणाला पैसे द्यायचा, ती यादी त्याने माझ्याकडे लिहून दिलीय ; खडसेंच्या गौप्यस्फोटाने प्रचंड खळबळ !

अधिवेशनात 'त्या' आमदारांपासून तर सगळ्या पुढाऱ्यांची नावं वाचून दाखवणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2022
in गुन्हे, जळगाव, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हातील गुटख्यासह इतर अवैध धंद्यातून होणाऱ्या वसुलीतून पोलीस अधिकारी, राजकारणीसह आणखी कुणा-कुणाला हप्ते जायचे याची एक मोठी यादी तत्कालीन एलसीबी पोलीस निरीक्षक किरण बकालेने आपल्याला लिहून दिली असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दूध संघातील भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यासाठी खडसे शहर पोलीस ठाण्यात मागील पाच तासापासून ठाण मांडून आहेत.

अधिवेशनात राजकारण्यांपासून तर सगळ्यांची नावं वाचून दाखवणार !

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

जिल्हा दूध उत्पादक संघातील लोणी (बटर) आणि दूध भुकटीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी गुरुवारी दुपारपासून शहर पोलीस ठाणे गाठून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार खडसेंनी दूध संघातील विक्रीतील अपहार प्रकरणी अध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या मांडणार असल्याचा पवित्रा घेतला. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतांना जळगाव जिल्ह्यात सट्टा, पत्ता, दारू सर्रास सुरु असून गुटख्याच्या धंद्यात तर राजकीय व्यक्ती सहभागी असल्याचा आरोप खडसे यांनी केला. तसेच बकाले माझा मित्र होता. परंतू त्याने चुकीचे वक्तव्य केले होते, त्याचा निषेधच आहे. पण बकालेने मला गुटख्यासह इतर अवैध धंद्यातून होणाऱ्या वसुलीतून पोलीस अधिकारी, राजकारणीसह आणखी कुणा-कुणाला हप्ते जायचे याची एक मोठी यादी मला देऊन गेला आहे. कोणत्या आमदाराला, पुढाऱ्याला किती पैसे देतो?, गुटख्याचे, मटक्याचे धंदे कुणाचे आहेत, हे सगळं बकालेने मला लिहून दिलं आहे. येत्या अधिवेशनात या सर्वांची नावं मी वाचून दाखवणार असल्याचे खडसे यांनी सांगितल्यामुळे खळबळ उडाली आहे.

खडसे समर्थकांसह मागील पाच तासापासून ठाण मांडून

जिल्हा दूध उत्पादक संघातील लोणी (बटर) आणि दूध भुकटीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी गुरुवारी दुपारपासून शहर पोलीस ठाणे गाठून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार खडसेंनी दूध संघातील विक्रीतील अपहार प्रकरणी अध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या मांडणार असल्याचा पवित्रा घेतला. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात समर्थकांसह ठिय्या दिला आहे. शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी आमदार खडसेंसह दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार अ‍ॅड. वसंतराव मोरे, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, दीपक फालक, वाल्मीक पाटील, योगेश देसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप

आमदार खडसे यांनी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना चांगलेच धारेवर धरले. आधी साध्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असला, तरी आता आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे, असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. गैरव्यवहार प्रकरणातील संशयितांना फरार करण्यास तुम्हीच जबाबदार आहात. तक्रार दिल्यानंतर लगेच गुन्हा दाखल केला असता, तर संशयितांना अटक करता आली असती. दूध संघातील विक्रीतील गैरव्यवहार प्रकरणी वेळीच गुन्हा दाखल करण्यात न आल्यामुळे दोन्ही संशयित फरार झाले असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १४ ऑक्टोबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : भुसावळचे तत्कालीन नगराध्यक्षांसह ९ नगरसेवक अपात्र ; जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ !

July 18, 2022

खळबळजनक : पाळधीजवळ लुटमारीचा प्रयत्न ; दोघांवर चाकू हल्ला, एक ठार !

November 27, 2021

कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे म्हणून छप्पन भोग नैवद्य -महामंडलेश्वर जनार्दन महाराज

November 17, 2020

संत सावता महाराजांची जन्मभूमी ‘अरण’ पुण्यभूमीला शासनाने ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा : पी.डी.पाटील !

July 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group