धरणगाव (प्रतिनिधी) समाज सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा, अशी समाजाला शिकवण देणाऱ्या परम पूज्य श्री सत्य साईबाबांच्या प्रेरणेने जळगाव तालुक्यातील ‘फेसर्डी’ या खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ते ४ थी मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.
धरणगाव येथील नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे स्वीय सहायक मंजिरी त्रिवेदी तसेच जिल्हा न्यायालयातील कार्यरत कर्मचारी बी. जी.नाईक यांच्या आर्थिक योगदानातून जळगाव तालुक्यातील ‘फेसर्डी’ या खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ते ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, वह्या, कंपास कीट, वॉटर बॉटल, लंच बॉक्स या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटे देण्यात आलीत.