नशिराबाद (सुनील महाजन) माजी जिल्हा उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याकडून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सभासदांना नुकतेच साहित्य वाटप करण्यात आले.
वन्यजीव संरक्षण जळगाव संस्थेचे सदस्य सर्पमित्र तुषार रंधे यांनी माजी जिल्हा उपाध्यक्ष लालचंद पाटील यांना भेटून सर्प हे विविध जातीचे असतात व त्यांना पकडण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे किट उपलब्ध करून दिल्यास वन्य प्राण्यांसह आमचेही संरक्षण होईल, असे सांगितले. त्यावर लालचंद पाटील यांनी क्षणाचा विचार न करता लागणाऱ्या साहित्याची विचारपूस करून दोन हुक(स्टिक), दोन बॅग, एक टॉर्चसह इत्यादी सामानाची किट उपलब्ध करून दिली. सर्पमित्र तुषार रंधे, अमित सोनवणे, लोकेश नेरकर, सागर भोई, विनायक सोनटक्के यांनी माजी जिल्हा उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचे आभार मानले आहेत.