जळगाव (प्रतिनिधी) येथील भारत पेट्रोलियम कंपनी, एमआयडीसी मधील पन्नास माथाडी कामगारांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी शेअर्स सर्टिफिकेट पतसंस्थेचे चेअरमन अँड. जमील देशपांडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कंपनी मधील सर्व माथाडी कामगार पतसंस्थेत सभासद झाले आहेत. लवकरच जिल्ह्यातील सर्व माथाडी कामगारांना शेअर देण्यात येतील अशी माहिती पतसंस्थेतचे चेअरमन अँड. जमील देशपांडे यांनी दिली आहे. माथाडी कामगारांनी खाजगी सावकार, किंवा फायनान्स कंपनी कडून जास्त दराने कर्ज घेऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व माथाडी कामगारांना शेअर्स दिले जातील, अशीही माहिती चेअरमन अँड. जमील देशपांडे यांनी दिली आहे. याप्रसंगी पतसंस्थेचे मॅनेजर पवार, मराठी प्रतिष्ठाणचे बाळू पाटील, मनसेचे संदीप मांडोळे उपस्थित होते.