TheClearNews.Com
Friday, January 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धार्मिक व प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली मार्गदर्शक तत्वे ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (जिमाका) दि. 3 – जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) हे मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जुंतुकीकरण करणे या नियमांचे व सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर गुरुवार, 7 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव श्री. अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहे.

प्रतिबंधात्मक उपाय :- 65 वर्षे वयावरील नागरिक, को-मार्बिड लक्षणे असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षे वयाखालील मुले यांनी घरीच थांबावे, धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारे व्यक्ती/संस्था/संघटना यांनी याठिकाणी भेट देणारे नागरिक व काम करणारे कामगार यांनी कोविड-19 ची लागण होऊ नये अथवा प्रसार होऊ नये याकरीता पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.

READ ALSO

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

याठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता कमीत कमी 6 फुट अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, प्रत्येक नागरिक, भेट देणारे व्यक्ती यांनी चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील, त्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, साबणाने वारंवार हात धुवावेत (कमीत कमी 40-60 सेंकद पर्यंत) अथवा हात निर्जंतुक करण्यासाठी अल्कोहोल मिश्रीत सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा, (कमीत कमी 20 सेंकद), श्वसनाबाबत शिष्टाचाराचे तंतोतंत पालन करण्यात यावे, खोकतांना व शिंकतांना तोंड व नाक झाकणे, शिंकतांना टीश्यु पेपर/हातरुमाल/ हाताच्या कोपऱ्याचा वापर करावा व टीश्यु पेपरची विल्हेवाट योग्यरित्या करावी, आरोग्याबाबत निरीक्षण करावे व आजाराबाबत राज्य किंवा जिल्हा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, याठिकाणी थुंकण्यास बंदी राहील, नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, आरेाग्य सेतू ॲप चे इन्स्टॉलेशन करुन त्याचा वापर करण्यात यावा.

 

सर्व धार्मिक स्थळे खालीलप्रमाणे सुनिश्चित करण्यात यावीत

प्रवेशाव्दारावर हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी व थर्मल स्क्रिनींग करण्यात यावे, Asymptomatic (लक्षणे नसलेल्या) व्यक्तीनाच प्रवेश देण्यात यावा, ज्या नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावलेले आहे, अशाच नागरिकांना प्रवेश देण्यात यावा, कोविड-19 विषाणूचे प्रतिबंधात्मक उपाययोजना दर्शविणारे फलक/भित्तीपत्रिका ठळक अक्षरात दिसतील अशाठिकाणी लावण्यात यावेत, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत श्रवणीय किंवा चित्रफीतव्दारे दररोज प्रसारण करण्यात यावे, अभ्यांगतांना प्रवेश टप्याटप्प्याने देण्यात यावा, धार्मिक स्थळांचा आकार, Ventilation याबाबी लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था यांचेमार्फत अध्यक्ष ट्रस्ट/बोर्ड यांनी धार्मिक स्थळात एका वेळी किंती व्यक्ती किती वेळेसाठी थांबवता येतील याचा विचार करुन Time Slot ठरवून द्यावेत.

पादत्राणे हे स्वत:च्या वाहनांमध्ये ठेवण्यात यावेत. आवश्यकतेनुसार पादत्राणे ठेवण्यासाठी स्वतंत्ररित्या व्यवस्था करण्यात यावी, वाहनतळांच्या ठिकाणी व आवारात गर्दी नियंत्रित करण्यासाठी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन व्यवस्थापन करण्यात यावे, बाहेरील आवारात असलेले शॉप्स, स्टॉल्स, Cafetarea च्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन व कोविड नियमावलीचे पालन करुन गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.

दर्शन घेण्याकरीता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन रागेत उभे राहण्यासाठी मार्किग करुन, 6 फुट अंतर ठेवण्यात यावे, अभ्यांगतांसाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमनाबाबत व्यवस्था करण्यात यावी, रांगेमध्ये उभे राहतांना दोन भाविकांमध्ये 6 फुट अंतर ठेवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची राहील, नागरिकांना बसण्याकरीता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन बैठक व्यवस्था करण्यात यावी, वातानुकुलीत/Ventilation Premises करीता CPWD विभागाकडील सूचनांचे पालन करण्यात यावे, वातानुकुलीत आवारात तापमान हे 24-30 अंश से. सेट करण्यात यावे व सापेक्ष आर्द्रता 40-70% व intake of fresh air शक्य तेवढे असावे व Ventilation पुरेसे असावे, मुर्ती/पुतळा/पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास प्रतिबंध राहील, मोठया प्रमाणात गर्दी होणारे मेळावे/एकत्र येण्यास प्रतिबंध राहील, कोविड-19 पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता रेकॉर्डींग केलेले भक्तीपर गाणे/संगीत वाजवण्यात यावे, परंतु वादक किंवा गायक गटास प्रतिबंध राहील, शारिरीक संपर्क टाळण्यासाठी नागरिकांना शुभेच्छा देणे/अभिवेदन करण्यास प्रतिबंध राहील, Common prayer mats शक्यतो टाळावे, भक्तांनी स्वत:चे prayer mats किंवा कापडाचे तुकडे घरुन आणावे व परत जातांना सोबत घेऊन जावे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोणतेही अर्पण उदा. प्रसाद वाटप किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी बाबी प्रतिबंधीत राहतील, धार्मिक स्थळाच्या परिसरात प्रभावीपणे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, आवारात असलेले शौचालये व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावा, धार्मिक स्थळांचा परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी संबंधित ट्रस्ट/संस्था/संघटना यांची राहील, परिसरातील Floor Area वारंवार स्वच्छ करण्यात यावा, अभ्यांगतांनी सोडून/फेकून दिलेले फेस कव्हर/मास्क/ग्लोव्हज इत्यादीचे योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात यावी, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कामगार/कर्मचारी यांना कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी पुरेसे साहित्य असणे आवश्यक आहे. तसेच कर्मचारी/कामगार यांची कामावर हजर होण्यापूर्वी तसेच आठवडयातून कोविड-19 चाचणी करणे आवश्यक राहील, शौचालये तसेच खाणावळी परिसरात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जागा, अंतर व संख्या याबाबतचे व्यवस्थापन कोविड नियमावलींचे पालन करुन करण्यात येईल याबाबतचे हमीपत्र पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे आवश्यक राहील. धार्मिक स्थळांच्या परिसरात कोविड संशयीत रुग्ण अथवा बाधित रुग्ण आढळून आल्यास करावयाची कार्यवाही अशा व्यक्तीस एका स्वतंत्र खोलीमध्ये किंवा परिसरात इतर लोकांपासून विलगीकरण (Isolated) करावे, अशा व्यक्तीस वैद्यकीय अधिकारी यांचेकडून पडताळणी होईपावेतो चेहऱ्यावर मास्क परिधान करणे आवश्यक राहील, अशा रुग्णाची माहिती तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर/रुग्णालयास कळविण्यात यावे.

अशा रुग्णांचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत परिक्षण करण्यात येईल व सदरची केस हाताळण्याबाबत आवश्यक ते व्यवस्थापन करुन अशा व्यक्तीचे संपर्कात असलेल्या व्यक्तीचे Tracing करुन तो राहत असलेला परिसर निर्जतूकीकरण करण्यात येईल, बाधित रुग्ण आढळून आल्यास सदरचा परिसर तात्काळ निर्जतुकीकरण करण्यात यावा. या आदेशाचे उल्लघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आदेशात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

January 29, 2026
गुन्हे

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

January 29, 2026
जळगाव

अजितदादा पवार यांना अशोक जैन यांची भावपूर्ण आदरांजली !

January 29, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
क्रीडा

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

January 28, 2026
Next Post

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई ; सुप्रीम कोर्टाची मंजूरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘चाळीस वर्ष मी चांगला होतो, मात्र राष्ट्रवादीत जाताच…’ ; खडसेंची भाजपवर टीका

January 10, 2022

संतापजनक : अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार ; रावेर पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 18, 2022

कार लोनची चौकशी करायला गेला आणि 23 लाख गमावून बसला ; सायबर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

February 15, 2023

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणीचे रविवारी आयोजन !

August 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group