जळगाव (प्रतिनिधी) नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन या महिन्याचा जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, २ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे.
यादिवशी लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांबाबत आढावा बैठक देखील होणार आहेत. जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील विभागांचा प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन व त्याबाबतचा निपटारा करुन यादिवशी आवश्यक त्या अहवालासह सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहावे. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

















