TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांच्या गुणवत्ता वाढीवर जिल्हाधिकाऱ्यांचा भर !

वेळेत गुणवत्तापूर्ण काम करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 1, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा वार्षिक योजनेत केल्या जाणाऱ्या कामांची गुणवत्ता वाढावी व वेळेवर गतीने काम पूर्ण करणे यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा भर आहे. यासाठी जिल्ह्यातील शाखा‌ अभियंता उप अभियंता, कनिष्ठ व स्थापत्य अभियंत्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आज घेण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना कामांची गुणवत्ता वाढ कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाजकल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातील नगरपालिकेने सर्व मुख्याधिकारी ही कार्यशाळेत सहभागी झाले होते.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

यावेळी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य पराग पाटील यांनी त्रयस्थ पक्षांचे लेखापरीक्षण करतांना आवश्यक कागदपत्रे, नियम व‌ तांत्रिक बाबींविषयी माहिती दिली. स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख व्ही.टी.पाटील यांनी बांधकामांची गुणवत्ता राखतांना घ्यावयाची दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. संकल्पचित्र तज्ज्ञ मिलिंद राठी यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने बांधकामासाठी कृत्रिम वाळूचे महत्त्व याविषयावर मार्गदर्शन केले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अभियंत्यांनी स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवावे. असे शब्दात बांधकाम व्यावसायिक भरत अमळकर यांनी मार्गदर्शन केले‌. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी शासकीय कामांचे बांधकाम करतांना लागणाऱ्या गौण खनिजांच्या परवान्यांसाठीची कार्यपद्धती व शासनाच्या अलीकडील सूचनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

वेळेत गुणवत्तापूर्ण काम करा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
कार्यशाळेच्या समारोप सत्रात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व अभियंत्यांशी बांधकाम करतांना घ्यावयाच्या स्थापत्य विषयक दक्षतेवर सहज संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांचे स्थापत्य विषयक तांत्रिक ज्ञान‌ पाहून उपस्थित आवाक झाले.
श्री.प्रसाद म्हणाले, कामांचे आदेश व एजन्सीची नेमणूक केली म्हणजे जबाबदारी संपत नाही. वेळेवर गुणवत्तापूर्ण काम करण्याची जबाबदारी तुमची आहे. कामांचे डिझाईन, मटेरियलची तपासणी करा. बांधकाम साईटवर कुशल कामगारच काम करीत आहेत‌‌. याची स्वतः खात्री करावी. बांधकामासाठी चोरीच्या गौण खनिजांचा वापर करण्यात येऊ नये. कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत तीन वेळा भेट द्यावी. मार्च २०२४ अखेर किती कामे पूर्ण होऊ शकणार नाही, याची माहिती १० नोव्हेंबरपर्यंत देण्यात यावी. कामांचे भूमिपूजन संविधान दिन २६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावे. भूमिपूजनासाठी पालकमंत्री, जिल्ह्यातील मंत्री, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची वेळ घेण्यात यावी. २६ जानेवारी २०२४ पर्यंत छोट्या स्वरुपातील सर्व कामे पूर्ण करण्यात यावी. कामांच्या ठिकाणी कोनशीला लावतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार विभागाची परवानगी व मान्यता घेण्यात यावी असे ही त्यांनी सांगितले. श्री.प्रसाद म्हणाले, ठेकेदारांकडून‌ २५ लाखांच्या वरील कामांचा गॅंट चार्ट (gantt chart) तयार करून घेण्यात यावा.‌ ५० लाखांच्या वरील कामांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून लेखापरीक्षण केले जाणार आहे.

गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्यांना बक्षिस
१५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत‌‌ गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करणाऱ्या शाखा, उप व कनिष्ठ अभियंत्यांना बक्षिस देऊन‌ गौरव केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

दुकान मालकाच्या घरी दिवाळीची साफ-सफाई ; १७ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धनादेश अनादर प्रकरणी एकाला सहा महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा ; धरणगाव न्यायालयाचा निकाल !

April 5, 2022

पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता? ; जाणून घ्या..आजचे इंधनाचे दर

May 23, 2022

स्थानिक तक्रार निवारण समितीकडे दाखल करू शकतात तक्रार : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

December 8, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आपल्या संपत्तीचा तपशील

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group