चोपडा (प्रतिनिधी) येथील प्रवाशी मीर तौसिफ अली असिफ अली सैय्यद या इसमाची मेक माय ट्रिप या ट्रॅव्हल कंपनी द्वारे जेट एअरवेज दुबई ते मबुई आणि मबुई ते आबुधाबीचे विमानाचे ऑनलाइन तिकीट बुक केले होते. तद्नंतर जेट एअरवेजचे विमानसेवा काही कारणास्तव रद्दद्द करण्यात आल्याने मेक माय ट्रिप या कंपनीने संबंधित ग्राहकाला तिकिटांची रक्कम परत मिळेल असे आश्वासन दिले. परंतु वारंवार तगादा लावून देखील ई-तिकिटाचे रक्कम परत न मिळाल्याने मीर तौसिफ अली असिफ अली सैय्यद यांनी आपली तक्रार ग्राहक मंच जळगाव येथे दाखल केली असता येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या निकालाने मेक माय ट्रिप व जेट एअरवेजला तिकिटांचे रक्कम व त्याच्यावरील व्याज आणि मानसिक त्रासमुळे पाच हजाराचा दंड व अर्ज करण्याचा खर्च तीन हजार अशी रक्कम अदा करायचा आदेश देण्यात आल्याने मेक माय ट्रिप व जेट एअरवेजला मोठी चपराक बसली आहे.
सविस्तर असे की, चोपडा येथील रहिवासी व तक्रारदार मीर तौसिफ अली असिफ अली सैय्यद या इसमाने दुबई ते मबुईचे जेट एअरवेजचे ऑन लाईन तिकीट बुकींग केले होते. तक्रारदारास दूरध्वनीद्वारे जेट एअरवेजचे विमानसेवा काही कारणास्तव रद्दद झाल्याचे कळविले. तिकिटाचे रक्कम परत मिळेल असे आश्वासन दिले होते परंतु तक्रारदाराने वारंवार मागणी करून देखील कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यावरून तक्रारदार मीर तौसिफ अली असिफ अली सैय्यद यांनी जळगाव ग्राहक मंचात मेक माय ट्रिप गुरगाव (हरयाणा) व जेट एअरवेज (मबुई) यांच्या विरुद्ध दि. २८/०८/१९ रोजी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीचा निकाल नुकताच दि.१५/१२/२०२१ ला लागला तक्रारदाराकडून ऍड.व्हि. पी.भस्मे यांनी काम पाहिले तर ही केस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर न्यायनिर्णय पूनम नि. मलिक यांच्या समोर सुरू होती.
न्यायनिर्णय श्रीमती पूनम नि. मलिक यांनी दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकून मेक माय ट्रिप व जेट एअरवेज हे दोघही सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. असा ठपका ठेवत दि. २०/०१/२०२० पासुन २०९३९ रक्कमवर ९% व्याजासह ही रक्कम अदा करतील तो पर्यंत व्याजासह दयावी लागेल आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५००० रुपये व अर्जाचा खर्च ३००० रुपये देण्याचे आदेश देण्यात आले. हा निर्णय पूनम नि. मलिक यांनी तर सद्स्य सुरेश एम.जाधव यांनी दिले. तक्रारदार कडून ऍड व्ही.पी.भस्मे यांनी संपूर्ण काम पाहिले.
मी मेक माय ट्रिप व जेट एअरवेज कडे अनेक वेळा रक्कमांची मागणी केली होती. परंतु ते कोणताही प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे नाईलाजस्तव ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करावी लागली. आणि मी ऑनलाईन पेमेंट केले आणि सर्व ऑनलाईन त्याच्याशी संभाषण केले ते सर्व सेव ठेवल्यामुळे ग्राहक मंचात तक्रारीची दखल घेऊन योग्य निर्णय दिल्यामुळे मला खरा न्याय मिळाला, असे मीर तौसिफ अली असिफ अली सैय्यदने सांगितले.