जळगाव (प्रतिनिधी) : युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे शनिवार दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकूल, जळगाव येथे जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने कुमार गट जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातून १५ मुलांचे त ४ मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. सदर आयोजन युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे. आयोजनाचे हे दुसरे वर्ष असून खेळाडूंना सरावासाठी व खेळाचा दर्जा वाढविण्यासाठी याप्रकारच्या स्पर्धा महत्तवाच्या असल्याचे मत युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनी मांडले.
स्पर्धेला मुख्य अतिथी म्हणून शिवसेना जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख तथा श्री. सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष संजय सावंत, युवासेना कार्यकारीणी सदस्य तथा मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य शितल देवरूखकर-शेठ, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रिडा संचालक डॉ. दिनेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, पोलीस निरीक्षक अरूण धनावडे, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन, गट नेते अनंत जोशी, जिल्हा संघटक गजानन मालपूरे, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, प्रा. समाधान महाजन, दीपक राजपूत, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना विस्तारक किेशोर भोसले, चैतन्य बनसोडे, अल्पसंख्यांक आघाडीचे जाकिर पठाण, नगरसेवक नितिन बरडे, प्रशांत नाईक, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, मंगला बारी, निलू इंगळे, मनिषा पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, युवासेना जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा, उपजिल्हा युवाअधिकारी पियुष गांधी, विश्वजीत पाटील, प्रशांत कुमावत, श्रीकांत पाटील, राहूल पोतदार, जितेंद्र बारी, महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, युवती सेनेच्या जया थोरात, वैषाली झाल्टे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी युवासैनिक अमित जगताप, प्रितम शिंदे, जळगाव जिल्हा हौशी बॉस्केटबॉल असोसिएशनचे जितेंद्र पाटील, आशिष पाटील, बबलू पाटील, संकेत भुतडा, युवासैनिक उमाकांत जाधव, अजय खैरनार, पियुष हसवाल, प्रशांत वाणी, भूषण सोनवणे, राहूल चव्हाण आदींनी परिश्रम घेत आहे.