जळगाव (प्रतिनिधी) ‘सर्वासाठी घरे’ या केंद्र सरकारच्या धोरणांतर्गत ३१ मार्च, २०२१ पर्यंत राज्य शासनामार्फत राज्यातील सर्व घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘महाआवास अभियान- ग्रामीण’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी शुक्रवार ३ डिसेबर, २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी असतील, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.