जळगाव (प्रतिनिधी) आमदार एकनाथराव खडसे रेती आता आणि हप्त्यांवर बोलायला लागले आहेत. जिल्ह्यात खंडणी, हप्तेवसुली हे उद्योग कुणाचे आहेत, कुणाच्या घरी हप्ते जात होते, हे जिल्हावासीयांना माहिती आहे. लोकांना सर्व कळायला लागले आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केली. (jalgaon news)
पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (gualabrao patil) यांनीही खडसेंवर टीका करत आमचा तो काळू तुमचा तो बाळू, असे चालणार नसल्याचे सांगितले. जिल्हा दूध संघातील बैठकीनंतर दोन्ही मंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खडसे यांनी विधानपरिषदेत अवैध वाळू वाहतूक व पोलिस हप्ते घेतात, असा आरोप केला होता. या प्रश्नाला मंत्री महाजन उत्तर देत होते. बकालेंना कुणीही पाठीशी घालत नाहीय. याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केलेला आहे. कोण हप्ते घेते, कुणाच्या घरी अवैध वाळू वाहतूक व पोलिस हप्ते जातात, चोराच्या उलट्या बोंबा नको. आम्ही जर बोललो तर अनेक विषय पुढे येतील, असा ईशारा देखील मंत्री महाजन यांनी दिला.
तर खडसे यांचे सभागृहात बोलणे केवळ नौटंकी असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. खडसे यांनी दुसऱ्यांच्या खात्यावर आरोप केले. त्यांच्या काळात मुक्ताईनगरमध्ये पोलिस निरीक्षक चंदेल ठाण मांडून होते. ‘मी केला तर काळू तुम्ही केला तर बाळू’ असे चालणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी ठणकावले.