नशिराबाद (प्रतिनिधी) शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या येथील मित्र परिवार गृपच्या तरुणांनी कोणाकडूनही मदत न घेता स्वतः पैसे एकत्र करून सामाजिक जाणिवेचे भान ठेवून दरवर्षीप्रमाणे यंदाही गोरगरिबांना दिवाळीचा फराळ वाटप करून गरिबांसोबत दिवाळी साजरी केली.
भागपूर येथील आदिवासी वस्ती व जळगाव येथील गरीबांना दिवाळीचा फराळ वाटप करून दिवाळी साजरी केली. दिवाळीत सगळीकडे धामधूम असताना वंचितांनाही या सणाचा गोडवा चाखता यावा, म्हणून हा उपक्रम गेल्या ८ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. दरवर्षी कुठल्याही प्रकारचे फटाके न फोडता गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी विविध उपक्रम राबवित दिवाळीत गोरगरिबांना फराळ वाटपाचे कार्य करण्यात येत आहे.
गरिबांच्या हातात दिवाळीच्या फराळ देतात त्यांच्या चेहर्यावर समाधान बघायला मिळाते यासाठी नशिराबाद मित्र परिवार ग्रुपचे सदस्य नरेंद्र धर्माधिकारी, योगेश कोलते, अक्षय वाणी, निरज चितोडे, अंशुल पिंगळे, अक्षय मराठे, भरत तिडके, गजानन जैन, राहुल चौधरी, सौरभ चौधरी, रोहित सोनार, शुभम वाणी, धवल मराठे, दिनेश सावळे, हेमंत चितोडे, संकेत मुळे आदींनी परिश्रम घेतले. हा ग्रुप वेगवेगळ्या समाजोपयोगी संकल्पना राबवून समाजसेवा करत आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गरीब व दुर्लक्षित लोकांना त्यांच्या पाड्यावर व वस्तीवर जाऊन फराळ वाटप करण्यात आले. भागपूर येथील आदिवासी वस्ती व जळगाव येथील विविध भागात असलेल्या गोरगरिबांना फराळाचे वाटप या तरुणांनी केले.