मुंबई (वृत्तसंस्था) वाहन चालकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. जर तुमचा पत्ता, मोबाइल नंबर बदलला असेल, तर तो आधार कार्डसह सर्व महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सवर अपडेट करण्याचं सांगितलं जातं, जेणेकरुन कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये. तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता अपडेट (Driving License Address) करू शकता. यासाठी RTO ऑफिस जाण्याची गरज भासणार नाही. तसंच एखाद्या एजेंटकडूनही हे काम करुन घेण्यासाठी पैसे भरावे लागणार नाहीत.
असा बदला ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता
सर्वात प्रथम parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
ऑनलाइन सर्व्हिसेस अंतर्गत “Driving License Related Services” पर्याय निवडा.
आता ड्रॉप डाउन लिस्टमधून तुमचे राज्य निवडा.
“License Related Services” च्या आतमध्ये “Drivers/ Learners License” पर्यायावर क्लिक करा.
येथे “Apply for Change of Address” पर्याय निवडा.
आता अर्ज सबमिट करण्यासाठी पुढील स्क्रीन दिसेल.
येथे तुम्हाला लायसन्स नंबर आणि जन्मतारखेची माहिती द्यावी लागेल.
पुढे “Get DL Details” वर क्लिक करा.
येसवर क्लिक केल्यानंतर लायसन्सची माहिती दिसेल.
आता तुम्हाला जवळील आरटीओ निवडून Proceed वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर नवीन पत्त्यासह सर्व डिटेल्स भरा.
पुढे Change of address on DL समोरील बॉक्सवर क्लि करा.
त्यानंतर “Permanent”, “Present”, अथवा “Both” पैकी एक पर्याय निवडा.
त्यानंतर कन्फर्म करून सबमिट करा.
ऑनलाइन चेक करा अॅप्लिकेशन स्टेट्स
सर्वात प्रथम parivahan.gov.in वर जा.
त्यानंतर Driving License Related Services पर्याय निवडा.
आता तुमचे राज्य निवडा.
त्यानंतर License Related Services पर्याया अंतर्गत Drivers/ Learners License हा पर्याय निवडा.
आता Application Status वर क्लिक करा
त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर आणि DOB टाका
आता captcha code टाकावा लागेल.
त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला अॅप्लिकेशन स्टेट्स स्क्रीनवर दिसेल.
या सर्व प्रोसेसनंतर तुम्हाला घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.
पत्ता बदलण्यासाठी किती शुल्क लागेल?
डॉक्यूमेंट अपलोड करताना हे सर्व jpeg, jpg आणि pdf फॉर्मेटमध्ये असणे गरजेचे आहे. ही सर्व कागदपत्रं सेल्फ-साइन्ड असणे गरजेचे आहे. तसेच, कागदपत्रांची सर्व माहिती देणे गरजेचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला ५०० रुपये शुल्क द्यावे लागेल. पेमेंट केल्यानंतर स्क्रीन अॅप्लिकेशन डिटेल्ससह अॅप्लिकेशन नंबर, डेट आणि पत्ता आणि ओरटीओ एड्रेस दिसेल. याशिवाय तुम्हाला अॅप्लिकेशन नंबरसह एक मेसेज येईल. त्याद्वारे तुम्ही स्टेट्स ट्रॅक करू शकता.
डॉक्यूमेंट्स असे करा अपलोड
सर्वात प्रथम parivahan.gov.in वर जा.
त्यानंतर Driving License Related Services पर्याय निवडा.
आता तुमचे राज्य निवडा.
त्यानंतर License Related Services पर्याया अंतर्गत Drivers/ Learners License हा पर्याय निवडा.
आता अपलोड डॉक्यूमेंट पर्याय निवडा.
त्यानंतर एप्लिकेशन नंबर आणि जन्मतारखेची माहिती देऊन सबमिट करा.
आता जे डॉक्यूमेंट अपलोड करायचे आहेत ते निवडा.
डॉक्यूमेंट नंबर व इतर माहिती देणे गरजेचे आहे.
आता डॉक्यूमेंट अपलोड करून सबमिट करा.
ड्रायव्हिंग लायन्ससवरील पत्ता बदलण्यासाठी ही कागदपत्रं आवश्यक
नवीन पत्त्याचा पुरावा – आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासबुक, लाइट बिल
पॅन कार्ड अथवा फॉर्म ६० अथवा फॉर्म ६१ ची अटेस्टेड कॉपी
लीगल इंश्योरेंस सर्टिफिकेट
फॉर्म ३३ एप्लिकेशन
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
पॉल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट
फायनान्सरकडून एनओसी
स्मार्ट कार्ड फी
चेसिस आणि इंजिन पेंसिल प्रिंट
गाडी मालकाचे साइन प्रूफ