TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

vijay waghmare by vijay waghmare
August 20, 2026
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरात ३१ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे मोजकेच पाईप वाहून गेले असताना, ते तात्पुरते जोडून नागरिकांना दिलासा देणे शक्य होते. मात्र, दुरुस्तीचे काम लांबवून अमळनेरकरांना मूलभूत पाणीपुरवठ्यापासून वंचित ठेवण्यात आले, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र (जितू) ठाकूर यांनी केला आहे.

येत्या दोन ते चार दिवसांत अमळनेर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पालिकेवर थेट जनमोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

अमळनेर शहरातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. २७-२८ जुलैनंतर शहरातील पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला असून, अनेक भागांत नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा थेंबही मिळालेला नसल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.

 

‘युद्धपातळीवर काम’ म्हणता, मग १०० मजूर का नाही ?

पालिका प्रशासनाकडून सोशल मीडियावर काम सुरू असल्याचे फोटो, व्हिडिओ आणि रील्स प्रसिद्ध केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात कामाचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही, असा आरोप ठाकूर यांनी केला. “खरोखरच युद्धपातळीवर काम करायचे होते, तर २५-३० मजुरांऐवजी १०० मजूर लावून दिवस-रात्र काम करून पाईपलाईन आठ-दहा दिवसांत का जोडली नाही? नागरिकांच्या मूलभूत गरजेपेक्षा कामाचा वेग वाढविण्याला प्राधान्य का दिले गेले नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पाणीवाटपात पक्षपाताचा आरोप

बायपास लाईनवरून सुरू असलेल्या पाणीवाटपावरही ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही भागांत दररोज काही मिनिटे पाणी मिळत असताना, शहरातील अनेक भागांतील नागरिकांना गेल्या १५-२० दिवसांत पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला. “काही भागांना नियमित पाणी आणि बहुतांश नागरिकांना प्रतीक्षा, असा भेदभाव का? अमळनेरमधील प्रत्येक नागरिकाला समान पाणीपुरवठ्याचा अधिकार आहे,” असे ठाकूर यांनी म्हटले.

पालिकेने टँकरद्वारे मोफत पाणी का दिले नाही?

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पालिकेने टँकरद्वारे मोफत पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक होते, असे ठाकूर यांनी म्हटले आहे. पालिकेच्या अपयशामुळे ‘जयनील फाउंडेशन’ सारख्या संस्थांना स्वतःच्या खर्चाने टँकरद्वारे नागरिकांची तहान भागवावी लागत आहे, याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.

‘पाणी मिळेपर्यंत पाणीपट्टीबाबत जाब विचारा’

दरवर्षी नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते; मात्र हक्काचे पाणी देण्यात पालिका अपयशी ठरत असेल तर नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला पाहिजे, असे आवाहन ठाकूर यांनी केले. “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणीपट्टी वसुलीसाठी येणाऱ्या पालिकेच्या पथकाला आधी नागरिकांना पाणी का मिळत नाही, याचा जाब विचारावा,” असे त्यांनी म्हटले.

‘राजकारण नाही, जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष’

“पाण्याच्या प्रश्नावर आम्ही कोणतेही राजकारण करत नाही. विरोधकही या कामात सहकार्य करत आहेत. अमळनेरची जनता संयमी आहे; मात्र तिच्या संयमाचा अंत पाहू नये. नागरिकांचे सातत्याने फोन येत असल्याने हा जाब विचारावा लागत आहे,” असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. येत्या दोन ते चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन पालिकेवर जनमोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दुरुस्तीचे श्रेय घेण्यासाठी फोटोसेशन होणार ?

पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका प्रशासनाकडून उद्घाटन, फोटोसेशन आणि सोशल मीडिया प्रसिद्धीचा धडाका सुरू होण्याची शक्यता असल्याची टीकाही ठाकूर यांनी केली. “जनतेला पाणी हवे आहे, उद्घाटनाचा सोहळा नाही. नागरिकांची तहान भागवणे ही पालिकेची जबाबदारी आहे; त्यासाठी फोटोसेशन करून उपकार केल्याचा आव आणण्याची गरज नाही. आधी पाणी द्या, नंतर श्रेय घ्या,” असा टोला ठाकूर यांनी लगावला. आता अमळनेरकरांचा संयम संपत चालला असून, दोन ते चार दिवसांत पाणीप्रश्न मार्गी न लागल्यास पालिकेविरोधात जनआंदोलन उभारले जाणार असल्याने प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मध्यप्रदेशातील डॉक्टर निघाला बनावट नोटांचे सिडींकेटचा मोहरक्या ; पोलिसांनी केली अटक !

April 8, 2025

आता एप्रिलमध्ये सुट्टीच्या दिवशीही कोरोना लस मिळेल

April 1, 2021

पिंप्रीत देशी दारूचे दुकान फोडले ; १९ पेट्या लंपास !

September 13, 2024

सामान्य रुग्णालयात मदर मिल्क बँक स्थापणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

September 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group