मुंबई (वृत्तसंस्था) एखादी जबाबदार व्यक्ती कायद्याचं पालन न करता बेफाम वागली तर कायदेशीर कारवाई होईल. माझ्यावरही होऊ शकते. कायद्याचं उल्लंघन केल्यावर आरती करायची का? असं नाही होतं. विशेषत: जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तींनी विशेष जबाबदारीने वागलं पाहिजे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
अनिल परब उत्तर देण्यास समर्थ
भाजपच्या नेत्यांना या या दिवशी अनिल परबांना चौकशीला बोलवणार हे कसं कळतं? किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कळतं… अजून दहा लोकांना महितीय… काय चाललंय? नोटिसा पाठवा, प्रेम पत्र आहेतही. राजकारणात काम करणाऱ्या माणसाला पाठवलेली. आम्ही त्यांना उत्तर देऊ.. आमच्यावर कायदेशीर कारवाई होतेय म्हणून आम्ही पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना धमक्या वगैरे देणार नाही. आम्ही या प्रक्रियेला पूर्ण सामोरं जाऊ, अनिल परब उत्तर देण्यास समर्थ आहेत, असं राऊत म्हणाले.
कायद्याचं उल्लंघन केल्यावर आरती करायची का?
माझ्या माहितीप्रमाणे आमच्या घरीही अशा नोटीस आल्या. परब रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. ते मंत्री आहेत त्यापेक्षा ते शिवसैनिक आहेत. शिवसेना कमजोर होईल, सरकारला तडे जातील आणि टपून बसलेल्या डोमकावळ्यांचा फायदा होईल असं होणार नाही. असे घाव आम्ही पचवले आहेत. आमची चिंता, अनिल परबांची चिंता अजिबात करू नका, असं सांगतानाच केंद्रीय मंत्र्यांवर कायदेशीर झाली. या देशात कोणावरही होऊ शकते. जर एखादी जबाबदार व्यक्ती कायद्याचं पालन न करता बेफाम वागली तर कायदेशीर कारवाई होईल. माझ्यावरही होऊ शकते. कायद्याचं उल्लंघन केल्यावर आरती करायची का? असं नाही होतं. विशेषत: जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तींनी विशेष जबाबदारीने वागलं पाहिजे, असे टोलेही त्यांनी लगावले.
अनिल परबच नाही तर अनेक लोक मुख्यमंत्र्यांच्या जवळचे
मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अनेक लोक आहेत. अनिल देशमुखही मुख्यंत्र्यांच्या शरद पवारसाहेबांच्या जवळचे होते. अनिल परबच नाही तर अनेक लोक मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे नोटिसा पाठवल्या तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं सांगतानाच लव लेटर येत आहेत. सरकारला दोन वर्षे होत आहेत. सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल. दिवार टूटेगी नही, कितना भी सर पटकलो. लव लेटरचं स्वागत करतो. कितीही पत्र काढा, आमचे लाखो शिवसैनिक तयार आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.