मुंबई (वृत्तसंस्था) पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला जामीन देण्यास डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाकडून नकार देण्यात आला आहे. डोमिनिकाच्या उच्च न्यायालयात मेहुल चोक्सीच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली. मेहुल चोक्सीचे अपहरण करुन जबरदस्तीने डोमिनिकात नेण्यात आल्याचा दावा वकिलांनी केला होता. मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
अँटिग्वामधून डोमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सी याला अटक करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील ०आरोपी मेहुल चोक्सीला जामीन देण्यास डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाकडून नकार देण्यात आला आहे. डोमिनिकाच्या उच्च न्यायालयात मेहुल चोक्सीच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली, तेव्हा न्यायालयाने चोक्सीला फ्लाइट रिस्कच्या कारणावरून जामीन देण्यास नकार दिला आहे.
मेहुल चोक्सीची तब्येत ठिक नाही. अशावेळी त्यांनी विमान प्रवास करु नये. कोणताही धोका पत्करु नये, असे न्यायालयाने म्हंटले आहे. दरम्यान, चोक्सी याच्या वकिलांनी म्हंटल की, करण्यात आलेली अटक बेकायदेशीर आहे. मेहुल चोक्सीचं अपहरण करुन जबरदस्तीने डोमिनिकात नेण्यात आल्याचा दावा वकिलांनी केला आहे. तसेच मेहुल चोक्सी याचा छळ करण्यात आला आहे. त्यांच्या शरीरावर जखमा असल्याचेही म्हटले आहे.
मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावल्यानंतर भारतातून फरार झाले होते. नीरव मोदी सध्या लंडनमधील जेलमध्ये असून भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान मेहुल चोक्सीने जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळ काढण्याआधी २०१७ मध्ये अँटिग्वा आणि बारबुडा देशांचं नागरिकत्व घेतलं होतं.