जळगाव (प्रतिनिधी) उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा महापौर भारतीताई सोनवणे यांच्याकडे दिला आहे.
माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी रात्री राजीनामा देण्याचे आदेश नुकतेच दिले होते. त्यानुसार डॉ. सोनवणे यांनी आज उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी डाॅ. साेनवणे यांना उपमहापाैरपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार डॉ. आश्विन सोनवणे यांनी आज महापौरपदाचा राजीनामा महापौर भारती सोनवणे यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान, डॉ. सोनावणे यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.