कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या फरकांडे येथील डॉ. शांताराम तापीराम वाघ (वय ५५) यांचे काल संध्याकाळी ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. आज सकाळी ९ वाजता अंत्यविधी पार पडली.
डॉ. शांताराम वाघ हे फरकांडे येथील माजी सरपंच होते व संजय गांधी निराधार योजना एरंडोल येथील माजी सदस्य होते. त्यांच्या पश्चाताप पत्नी, २ मुले १ मुलगी सून असा परिवार आहे. कासोदा प्राथमिक कासोदा आरोग्य उप केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पृथ्वीराज (चेतन) वाघ यांचे वडील होते.