TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आज ठरेल राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियन ; दहाव्या फेरीत खेळाडूंनी दाखवला “दस का दम !

मुलांमध्ये दिल्लीचा दक्ष गोयल, गुजरातचा जीहान शाह, महाराष्ट्राचा पारस भोईर संयुक्तपणे तर मुलींमध्ये मृत्तिका मल्लिक निर्विवादपणे आघाडीवर !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अनुभूती निवासी स्कूल सुरू असलेल्या राष्ट्रीय सबज्युनीअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या आठव्या दिवशी दहाव्या फेरीचे सामने खेळवण्यात आले. यावेळी झालेल्या चुरशीच्या सामन्यांमध्ये स्पर्धकांनी आपल्या बुद्धीचा कस लावत अत्यंत महत्वाच्या गुणाला गवसणी घालण्यासाठी अतोनात प्रयत्न केल्याचे दिसले.

मुलांमध्ये दहाव्या फेरीत खुल्या गटातील पहिल्या पटावरील खेळल्या गेलेल्या सामन्यात पांढऱ्या सोंगट्याकडून खेळताना इम्रानने लंडन पद्धतीत आपल्या मोहऱ्यांचा विकास केला. पण कमकुवत झालेल्या ई ४ घराचा फायदा न उचलता आल्याने दिल्लीच्या दक्षने वर्चस्वाची संधी गमावली, जास्त मोहऱ्यांच्या अदलाबदली मुळे डाव हत्तीच्या अंतिम स्थिती कडे झुकला आणि अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत राहिला. तर दुसऱ्या पटावर जिहान शाहने अदक बिवोर विरुद्ध खेळताना डावाच्या मध्यभागी जोरदार मुसंडी मारत आपल्या वजीर आणि हत्तीला पहिल्या आणि दुसऱ्या आडव्या पट्टीवर ताबा वाढवत उंटाला अडकवून टाकले व पांढऱ्या सोंगट्यांचा समन्वय तोडत महत्त्वाचा डाव आपल्या नावावर केला.

READ ALSO

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

तिसऱ्या पटावर महाराष्ट्राच्या पारसने वत्सलचा सिसिलियन बचाव मोडून काढत ओपनिंग मध्येच प्याद्याची बढत घेतली. मिडलगेम मध्ये वजिराची मारामारी करत, घोड्याला फ ५ जागेवर नेऊन अचूक तांत्रिक खेळ करत, खेळाला कलाटणी देत डाव आपल्या नावावर केला. चौथ्या पटावर प.बंगालच्या सम्यक धारेवाने तेलंगणाच्या मोक्षिथ पासुपुलेतीच्या कमकुवत काळ्या घरांचा फायदा घेत सी पट्टीतील आणि ई पट्टीतील प्यादे आपल्या ताब्यात घेतले, आपल्या प्यादांना पुढे पुढे ढकलत दबाव वाढवला आणि डाव सहजपणे जिंकला. पाचव्या पटावर कुशाग्र जैन व माधवेंद्रा मधील सामना मध्ये पटावरील स्थिती ३ वेळा एकसारखी आल्याने अनिर्णीत घोषित करावी लागली.

दरम्यान दहाव्या फेरिअखेर दिल्लीचा दक्ष गोयल, गुजरातचा जीहान शाह, महाराष्ट्राचा पारस भोईर संयुक्त पणे प्रथम क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर साडे सात गुणांसह सम्यक धरेवा व इम्रान असून तब्बल नऊ खेळाडू ७ गुणांसह तृतीय स्थानांवर आहेत.

मुलींच्या गटात पहिल्या पटावर मृत्तिका मल्लिक ने सिसिलियन बचावाचा वापर करून विरुद्ध दिशेला राजाला संरक्षित केले, सामान्यत अशा परिस्थितीत आक्रमण हे एकमेव हत्यार योग्य समजले जाते. आपल्या तीन प्यादे व हत्तीचा आक्रमक वापर करून पांढरा राजाची बाजू मृत्तिका ने खिळखिळी केली आणि अक्षया साथी बरोबर विजय संपादन करून स्पर्धेतील विजेते पदावरील दावा पक्का केला. तिसऱ्या पटावरील साची जैन ने शुभि गुप्ता चा खळबळजनक पराभव केला, शुभि च्या वजिराच्या अनेक चाली चुकल्यामुळे शेवटी तिला पराभवाचा सामना करावा लागला.

चौथ्या पटावर संनिद्धी ने सुरवातीच्या भागात आपली परिस्थिती वरील पकड मजबूत केली, पण मिडलगेम मध्ये खेळलेल्या हत्तीच्या डी ३ चुकीमुळे व ए ७ ते जी १ या कमकुवत तिरप्या पट्टीमुळे सी ४ वर येणाऱ्या काळ्या प्याद्याची चाल व त्यानंतर वजिराला सी ५ घरावर येणाऱ्या स्नेहा हळदर आकस्मात चाली मुळे संनिद्धी च्या विजेतेपदाच्या स्वप्नांवर पाणी फिरले आणि अवघ्या ३९ चालितच डाव संपला. अनुपमा श्रीकुमार ने डावाच्या सुरवातीला आक्रमकता दाखवून वजिराला जिंकले पण उंटाच्या फ ४ व वजिराने हत्तीला मारण्याची चूक तिला महागात पडली शेराली पटनाईक ने कुठलीही चूक न करता डाव खिशात घातला.
दहाव्या फेरिअखेर मृत्तिका निर्विवाद पणे साडे आठ गुणांसह आघाडीवर असून, साडे सात गुणांसह साची जैन, शेरालि पटनाईक, स्नेहा हळदर द्वितीय स्थानांवर आहेत. तसेच अजून तब्बल सात खेळाडू सात गुणांसह निवडीसाठी निकराने प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आज स्पर्धेचा शेवटच्या दिवशी एकूणच अंतिम गुणतालिका गुंतागुंतीची होणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही गटातील विजेतेपद व संघ निवडीमध्ये कोणाला समाविष्ट केले जाईल याकडे आता संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिले आहे.

आज अंतिम फेरी…!

आज अंतिम फेरीचा खेळ होणार असल्याने खेळाडूंमध्ये त्याविषयीची कमालीची उत्सुकता काल दिसून आली. तब्बल ९ दिवस एकमेकांच्या सोबत राहिलेले अनेक राज्यातील खेळाडूंचे मैत्रीचे नातेही यातून खेळाच्या प्रांगणात पाहायला मिळाले. आपल्या सामन्यांबद्दलचे बारकावे व चालींच्या चर्चेव्यतिरिक्त भारतीय “अनेकता मे एकता” याचेही दर्शन झाले.
राज्यभरातील मान्यवरांची होती उपस्थिती.

आठव्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीला सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली. त्यात पालघर येथून महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सहसचिव निनाद पेडणेकर, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे खजिनदार विलास म्हात्रे, अहमदनगर जिल्हा चेस सर्कल चे सचिव यशवंत बापट व पालघर जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार विवेक उधारे आदि मान्यवरांसह चिफ अरबिटर देबाशिष बरुआ, जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार नंदलाल गादिया हे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
Next Post

पंकज इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आपल्या सर्जा-राजाला वाचवण्यासाठी शेतकरी भिडला थेट पट्टेदार वाघासोबत !

August 5, 2023

धक्कादायक ! १४ वर्षीय मुलीवर जंगलात अत्याचार ; भिवंडीत मालकाला अटक

December 16, 2021

आषाढी एकादशी निमित्त एकनाथराव खडसेंतर्फे मुक्ताईच्या गाभाऱ्यात सव्वा क्विंटल खजुराची आरास !

June 29, 2023

ट्रक-कारच्या भीषण अपघातात ४ तरुण ठार !

December 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group