TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यातील पोलीस पाटलांना आता १५००० भरघोस मानधन ; आमदार मंगेशदादा चव्हाण व पोलीस पाटील संघटनांच्या प्रयत्नांना यश !

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांनी शब्द पाळला !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 14, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) पोलीस पाटील हे ग्रामीण भागातील जनता व पोलीस प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करतात. कोविड काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता गावाच्या रक्षणासाठी त्यांनी काम केलं आहे. मात्र त्यांना मिळणारे ६५०० हे मानधन अतिशय तुटपुंजे असल्याने राज्यातील पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.

यासाठी पोलीस पाटील संघटनांच्या वतीने चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. यासाठी अधिवेशनादरम्यान मोर्चे काढण्यात आले, अनेक शासकीय स्तरावर बैठका घेण्यात आल्या. अखेर आमदार मंगेशदादा चव्हाण व पोलीस पाटील संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पोलीस पाटील यांचे मानधन ६५०० वरून थेट १५००० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

दि.७ मार्च रोजी चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाला नामदार गिरिषभाऊ महाजन आले असता तालुक्यातील पोलीस पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे तुमच्या विषयाबाबत अतिशय सकारात्मक असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याचे आश्वासन दिले होते. अखेर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मानधनवाढीचा निर्णय झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांनी आपला शब्द पाळला आहे. त्याबद्दल सर्व पोलीस पाटील संघटनांच्या वतीने त्यांचे व यासाठी पाठपुरावा करणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

कायदा सुव्यवस्था दृष्टीने महत्वाच्या घटकाला भाजपा महायुती सरकारने न्याय दिला – आमदार मंगेश चव्हाण

पोलीस व गाव यातील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात, अनेक कठीण प्रसंगात त्यांची मोलाची मदत प्रशासनाला होत असते मात्र त्यांना मिळणारे अतिशय अल्प मानधन व शासनाकडून कुठल्याही भरीव सुविधा त्यांना मिळत नसल्याने त्यांच्या विविध मागण्यांसाठी माझा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. मागील काळात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना सन २०१९ मध्ये पोलीस पाटील यांचे मानधन ३००० वरून दुप्पट ६५०० करण्यात आले होते मात्र नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत ही वस्तुस्थिती होती, त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस हेच पोलीस पाटील वर्गाला न्याय देऊ शकतात याचा मला विश्वास होता. आज अखेर भरघोस अशी मानधनवाढ करण्याचा मंत्री मंडळ बैठकीत निर्णय झाल्याने ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या एका जबाबदार घटकाला भाजपा महायुती सरकारने न्याय दिला अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

२० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य अंतिम फेरीत नाट्यरंग जळगावच्या तीन कलावंतांनी पटकावली पारितोषिके !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

५५ हजारांची लाच भोवली ; मुख्याधिकाऱ्यासह फायरमन अडकले जाळ्यात !

May 11, 2024

पातोंडा केंद्रात शिक्षकांच्या अँटीजेन चाचण्या; विद्यार्थ्यांची देखील कोरोना चाचणी करा – पालकांची मागणी

November 20, 2020

Horoscope : राशिभविष्य, शनिवार १४ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

May 14, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक भविष्य १४ ते २० ऑगस्ट २०२२ !

August 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group