कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुण्यस्मरणार्थ श्री बैठक कासोदा यांच्यातर्फे एरंडोल भडगाव रोड लगत असलेल्या गिरणा कॉलनीच्या पाठीमागे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन अभियान राबविण्यात आले.
याप्रसंगी ५० वेगवेगळ्या वृक्षांची लागवड करण्यात आली लागवड करताना गावातील प्रथम नागरिक महेश ओमकार पांडे, सरपंच कासोदा, नरेश ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक कासोदा, नरेश ठाकरे ग्रामपंचायत सदस्य कासोदा, राजेंद्र ज्ञानदेव, जमादार चेअरमन नंदराम दगडुराम, मंत्री पिक संरक्षक सोसायटी योगेश चौधरी जिल्हा उपाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संस्था जळगाव, आनंदा हरी मिस्त्री ज्येष्ठ नागरिक अण्णा लोहार, अनिल परदेशी, दुर्गादास पाटील रमेश पाटील, पी रण पाटील जवखेडे, नाना पवार नांदेड खुर्दे, बंटी लोहार, राकेश ठाकरे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.