धरणगाव (प्रतिनिधी) संघाचे सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी देशासाठी व समाजासाठी निस्वार्थ केलेले कार्य समाजाला दिशादर्शक आहे. माझ्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्या नावाने राज्यात पहिलीच ग्रामपंचायत स्थापन झाली असून त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आम्ही बोलतो त्याप्रमाणे विकास कामे करणारे आहोत. गावाला दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली असून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी दूर होण्यासाठी गावाला १९ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. क्रांतिकारी ख्वाज्याजी नाईक स्मृतीस्थळापर्यंत २ कोटींचे रस्ता काँक्रिटीकरण, ग्रामपंचायत कार्यालय मंजूर केले असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. हेडगेवारांनी दिलेला लोक कल्याणकरी विकासाचा मंत्र जोपासून ग्रामपंचायतीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही व गाव आदर्श करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने अमळनेर तालुक्यात तब्बल १३९ पा. पु. योजना सुरु असून आम्ही जिल्ह्यातील तीनही मंत्री खासदार व आमदार पाडळसरे धरणाचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्शील असून पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणारच अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील यांनी दिली. ते डॉ. हेडगेवार नगर येथे १९ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
अशी आहे योजना
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डॉ. हेडगेवार नगर येथे पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होण्यासाठी मंजूर केलेली १९ कोटींची पाणीपुरवठा योजनेचा पाण्याचा स्त्रोत हा १२ किमी अंतरावरील अंजनी धरणावरून घेण्यात आला असून १२ किमीच्या मोठ्या पाईपलाईन सह गाव अंतर्गत पाईपलाईन, जलकुंभ व अनुषंगिक बाबींचा समावेश आहे. या योजनेचे तसेच पर्यटन योजनेतर्गत २ कोटीच्या जळगाव रोड ते क्रांतिकारी ख्वाज्याजी नाईक स्मृती स्थळाकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील व मदत पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील यांच्या हस्ते जल्लोषात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसरपंच चंदन पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजूर केलेल्या १९ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेची सविस्तर माहिती विषद केली. सूत्रसंचालन माजी नगरसेवक अभिजित पाटील यांनी तर आभार भाजपच्या तालुका महिला सर चिटणीस दिक्षा गायकवाड यांनी मानले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जलजीवन मिशनमुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम झाले असून त्यामुळे महिलांचे जीवन सुकर होत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ९९ % योजनाना वर्क ऑर्डर देण्यात आल्यासून अनेक कामे प्रगतीत आहे. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते यांनी सांगितले की, “गुलाबभाऊ “ म्हणजे आपल्या हक्काचा माणूस असून विकास करणारा आहे. बँकेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी गुलाब भाऊंना पानिवले बाबा व भविष्यातील भाग्यवान आमदार म्हणून उल्लेख केला. मंत्री अनिलदादा पाटील यांनी सांगितले की, दुसरे कोणी तुमच्या सोबत असोत व नसोत आमचे घड्याळ मात्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही दिली. व्यासपीठावरून एकामेकांना चिमटेही घेण्यात आले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
जिल्हा प्रमुख निलेश पाटील, प्रांत कार्यवाहक आर, एन, महाजन सर, जेष्ठ नेते डी. जी. पाटील, हेगडेवार नगर सरपंच सविताताई सोनवणे, धनराज सोनवणे, उपसरपंच चंदन पाटील, भाजपाचे जेष्ठ नेते सुभाष अन्ना पाटील, माजी सभापती पी. सी.आबा पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजयजी पवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रोहितजी निकम, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील सर, शेखर अत्तरदे, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, जिजाबराव पाटील, उद्योजक मनोज बियाणी, राजू पारीख, शिरीष बयास, भीमराव पाटील, भानुदास विसावे, कमलेश तिवारी, पप्पू भावे, मोहन पाटील, विलास महाजन, दिलीप महाजन, कन्हेया रायपुरकर, सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. पुंडलिक सपकाळे, मंगलाताई महाजन, चारूशिला पाटील, भारतीताई चौधरी, रेखाताई पाटील, ग्रा. पं. सदस्य संभाजी सोनवणे, शीलाताई देशमाने, स्वाती चौधरी, डॉ. हेडगेवार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.