चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी.आर. देवरे यांना नुकतेच भारत सरकारकडून पेटंट कायद्यांतर्गत पेटंट प्राप्त झाले आहे. त्यांनी AI BASED FINANCIAL VOLATILE SHARE MARKET ANALYSIS DEVICE या डिवाइसचे रजिस्ट्रेशन काही दिवसांपूर्वी पेटंट कायद्याअंतर्गत करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार त्यांना भारत सरकारकडून पेटंट कायदा अंतर्गत नुकतेच पेटंट जाहीर झालेले आहे.
डॉ. सी.आर. देवरे यांनी ज्या डिवाइससाठी पेटंट घेतले असून सदर डिवाइस शेअर मार्केट मधील विविध कंपन्यांचे शेअर्स किंवा विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची परिस्थिती कशी आहे व त्याच्यामध्ये किती प्रमाणात धोके आहेत, याचे स्पष्टीकरण व विश्लेषण या डिवाइसच्या मार्फत करण्यात येणार आहे. त्यांनी केलेल्या संशोधनासाठी पेटंट प्राप्त झाले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील, उपाध्यक्षा आशाताई पाटील तसेच सर्व कार्यकारी विश्वस्त मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच सर्व शाखांचे उपप्राचार्य व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.