जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशउपाध्यक्षपदी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष खासदार डॉ. उल्हास पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुन्नवर खान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवा फाऊंडेशन जलीलदादा पटेल, युवक काँग्रेसचे भुसावळ विधानसभा अध्यक्ष इम्रान खान, भुसावळ काँग्रेस शहरध्यक्ष रवींद्रभाऊ निकम, आर.पी. इंडस्ट्रीजचे संचालक राहील पटेल, प्रा. शबनम पटेल, महिला शहराध्यक्षा यास्मिनबानो, राणीजी खरात, डॉ. वर्षाताई पाटील, डॉ. केतकीताई पाटील, प्रमोद भिरुड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.