फैजपूर(प्रतिनिधी) येथील प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची नुकतीच भुसंपादन अधिकारी म्हणून अहमदनगर येथे बदली झाली असून निरोपसमारंभात त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. फैजपूर शहरातील मोजक्या पदाधिकारी यांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. येथील श्री लक्ष्मी सॉ. मीलचे सभागृहात नरेंद्र नारखेडे मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तीन वर्षांपासून फैजपूर प्रांताधिकारी म्हणून डॉ. थोरबोले यांची कारकिर्द यशस्वी व पारदर्शी राहिली असून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यांनी केले. फैजपूर प्रांताधिकारी म्हणून व कोरोना रोग महामारी नियंत्रण अधिकारी म्हणून डॉ. थोरबोले यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तरं देतांना प्रांताधिकारी यांनी सर्व लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते जनता व पत्रकार यांनी मला काम करताना मोठी मदत करून साथ दिली. यामुळे या काळात लोकसभा विधानसभा निवडणूक व कोरोना नियंत्रण अशी मोठी कामे यशस्वी पार पडली. फैजपूर जनतेचे प्रेम व मी सदैव हृदयात साठवुन ठेवील. फैजपूर मध्ये काम करतांना खूप शिकायला मिळाले. मोठा मित्र परिवार मिळाला व विशेष माझे कारकिर्दीत झालेला २७ कुंडी महाविष्णू याग महोत्सव माझे कायम स्मरणात त्यांनी सर्वांचे ठेवून त्यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कार नरेंद्र नारखेडे यांनी केले. प्रमुख उपस्थिती वसंतराव पाटील औद्योगिक वसाहत चेअरमन मनोजकुमार पाटील, व्हा. चेअरमन सातपुडा चंद्रशेखर चौधरी, पंडितराव कोल्हे, विजयकुमार परदेशी, अनिल नारखेडे, राजू महाजन, किरण चौधरी, नगरसेवक देवेंद्र साळी, भागवत पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. गिरीश लोखंडे, योगेश भावसार, योगेश सोनवणे, डॉ. पद्माकर पाटील, सुभाष गलवाडे, मयूर नारखेडे, राजू मिस्त्री उपस्थित होते.