भुसावळ (प्रतिनिधी) आज प्रभु श्री रामचंद्र नवमीनिमित्त डॉ. नितु पाटील यांनी वरणगावमधील त्यांचे मित्र रोहन चंद्रभान भोई यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ वरणगाव शहर व भुसावळ तालुक्यातील सर्व नागरिकांच्या सेवेसाठी आजपासून एसी/ नॉन एसी ऑक्सिजनसह नवीन रुग्णवाहिका सेवेचे अनावरण रोहन भोई यांच्या आई इंदुबाई चंद्रभान भोई यांच्या हस्ते तर लोकार्पण सोहळा डॉ. नितु पाटील यांच्या हस्ते झाला.
यावेळी रोहन यांना शाल आणि प्रभु श्री. रामरक्षा वासुदेव नेत्रालयातर्फे भेट देण्यात आली. यावेळी नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी, नगरसेवक रविंद्र शांताराम सोनवणे, दिलीप गायकवाड, विमुक्त भटक्या जाती जमाती जिल्हाध्यक्ष, पत्रकार राजू खडसे, सुभाष भोई, रोहन भोई, चेतन धनगर, विशाल बावणे, दिनेश भोई, भगवान भोई आदी उपस्थित होते.
“ही रुग्णवाहिका नसून रुग्णांचे प्राण वाचवणारी ‘प्राणवाहिका’ आहे. युवा रोहन याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. सदर रुग्णवाहिका वासुदेव नेत्रालयातर्फे सॅनिटाइझ केली जाईल, याबाबत रोहन याने निश्चित राहावे, असा शब्द त्याला याप्रसंगी देण्यात आला आहे.'”