जळगाव (प्रतिनिधी) जादा बिल आकारल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार, शल्य चिकित्सक चव्हाण यांनी २ लाख ४४ हजार रुपये परत करायचे काढलेल्या आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी डॉ. निलेश किंनगे यांच्या दवाखान्याची तसेच मेडिकलची मान्यता रद्द करा, अशी तक्रार थेट दीपक कावळे यांनी IMA(INDIAN MEDICAL ASSOCIATION ) कडे केली आहे.
शल्य चिकित्सक चव्हाण यांनी चौकशी करून रीतसर आदेश काढल्यावर देखील डॉ. नीलेश किंनगे हे तक्रारदार दीपक कावळे यांचे ज्यादा घेतलेले २ लाख ४४ हजार रुपये अद्यापही परत करत नसून तर तोडीपाणी साठी निरोप पाठवत आहेत. तक्रारी केल्यास तुला एक रुपयाही मिळणार नाही, अशी धमकी दिली जात आहे. जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक यांच्या आदेशाला डॉ. नीलेश किंनगे महत्त्व देत नाही. यामुळे डॉ. निलेश किंनगे यांची दादागिरी ही वाढत चालली असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.