जामनेर (प्रतिनिधी) सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त कृष्णा वाघ यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२० बुधवार रोजी पार पडणार असून या पुरस्कार वितरण मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.
वर्धापन दिन कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर, ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. डॉक्टर सागर गरुड यांचा परिचय असा आहे. डॉ. सागर सुधाकर गरुड जन्म दिनांक:- १६/११/१९८३, मु.पो. शेंदुर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पाचोरा, संचालक यापूर्वी मिळालेला विशेष पुरस्कार, दैनिक दिव्य मराठीने गौरव रुग्णसेवा चा २०१९ हा पुरस्कार प्रदान केला गेला.
कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्रातील विविध संस्थांनी सन्मानपत्र देऊन गौरवले आहे. सागर गरुड यांचे उल्लेखनीय कार्य ह्या समाजाचे आपण देणे लागतो हा मानव देह पुन्हा नाही” यामुळे समाजाची सेवा आपण केली पाहिजे असे मत डॉक्टर सागर गरुड यांचे आहे. डॉक्टर सागर यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण कुठे मुंबई पुणे येथे न जाता आपल्याच भागातील जनतेची सेवा करता यावी याकरिता ग्रामीण भागात प्रशस्त असे मोठे हॉस्पिटल उभारून पुणे मुंबई येथे जाऊन रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी याकरता पाचोरा जिल्हा जळगाव येथे सगळ्या सोयी युक्त असे विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल याचे उद्घाटन केले. एकाच छताखाली सगळ्या प्रकारचे वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत हजारो हून अधिक मोफत ऑपरेशन यशस्वी झालेले आहेत. कोरोनाच्या कठीण काळामध्ये ओपीडी ही मोफत ठेवली होती. त्यांनी स्वतः आपला विघ्नहर्ता हॉस्पिटल राज्य सरकारला कोविड केअर सेंटर म्हणून मोफत दिला होता.
शेंदुर्णी भडगाव पाचोरा या ठिकाणी ते वैद्यकीय सेवा देत असतात. विविध गावांमध्ये आरोग्य शिबिर घेणे, रक्तदान शिबीर घेणे, अन्नदान वाटप करणे, शेतकऱ्यांना मदत करणे, वृक्षारोपण करणे, असे विविध उपक्रम डॉक्टर सागर गरुड राबवित असतात. जामनेर पाचोरा तालुक्यामध्ये गावागावांमध्ये आरोग्य सेवक त्यांनी नेमले आहेत. आरोग्यसेवेचे महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे. या आदर्श डाँक्टर सागर गरुड यांना माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यानी कळविले आहे. ह्या पुरस्काराबद्दल डॉ सागर गरुड सरांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.