जळगाव (प्रतिनिधी) डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे जीवरसायनशास्त्र या विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेले प्रा. विठ्ठल शिंदे यांना वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्वीकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील जीवरसायनशास्त्र या विषयात मधुमेहाच्या आजारावर संशोधन केले आहे. त्यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. तसेच त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर सात प्रकाशने प्रकाशित झाले आहे. याशिवाय त्यांना जीवरसायनशास्त्र या विषयात अध्यापनाचा १२ वर्षाचा अनुभव आहे. त्यांना जीव रसायनशास्त्र ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.एम.जी.कालेकर यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टरेट मिळाल्याबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ.एन. एस.आर्विकार, डॉ. संजय बनसोड, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, डॉ. बापूराव बीटे, विजय मोरे, डॉ. देवेंद्र चौधरी यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.