मुबंई(वृत्तसंस्था) : मुंबईमधून ड्रग्ज पकडण्यात(Drugs seized in Mumbai) आलेला प्रकार समोर आलेला आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने जवळपास ५० किलोपेक्षा जास्त एमडी ड्रग्ज (Drugs) जप्त केलेले आहे.
माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी(Mumbai Police) यावर कारवाई करुन जप्त केलेल्या एमडी ड्रग्जची किंमत ५० कोटींहून अधिक सांगितली जात आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही विचारल्यास या ड्रग्जची किंमत जवळपास ५० कोटींहून अधिक सांगितली जात आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाने या कारवाईत एकूण पाच तस्करांना अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास मुंबई पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे.