भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राज्यात प्रतिबंधीत असलेले 73 लाखांचे मेथाक्वॉलोन ड्रग्ज एका हॉटेलमधून जप्त करीत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईने ड्रग्ज पेडलरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
या आरोपींना अटक
याप्रकरणी कुणाल भरत तिवारी (30, प्लॉट नंबर 24, तापी नगर, भुसावळ), जोसेफ जॉन वालाड्यारेस (28, रामायण नगर, कंटेनर यार्ड, वरणगाव रोड, भुसावळ), दीपेश मुकेश मालवीय (31, लाल जैन मंदिरामागे, भुसावळ) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भुसावळसह परिसरात या ड्रग्जची विक्री सुरू होती. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक शोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, विजय नेरकर, महेश चौधरी, यासीन पिंजारी, भूषण चौधरी, अमर आढाळे आदींच्या पथकाने केली.