जयपूर (वृत्तसंस्था) सुदानमधील महिलेकडून ६ कोटींचे ड्रग्स जप्त केले आहेत. हे ड्रग्स तिने प्रायव्हेट पार्ट (रेक्टम-वेजाइना) आणि पोटात लपवून आणले होते. हे काढण्यासाठी तब्बल ११ दिवस लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय पथकाने केलेल्या तपासणीत, या महिलेने आपल्या शरिरात ८८ कॅप्सुल्स लपविले असल्याचे समोर आले होते. कॅप्सूल जप्त केल्यानंतर तिला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.
१९ फेब्रुवारीला सुदानची ही महिला जयपूर एयरपोर्टवर पोहचली होती. या महिलेने मोठे ड्रग्ज आणल्या माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. प्राथमिक चौकशी महिलेने तोंड उघडले नव्हते. त्यानंतर शारिरिक तपासणी केली असता तिने गुप्तांगात ड्रग्ज लपविल्याचे निष्पन्न झाले. डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडून तिच्या वैद्यकीय चाचणीची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर हे ड्रग्ज काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. तिचा एक्स रे करण्यात आला. त्यात ८८ कॅप्सुल्स तिच्या पोटात आणि गुप्तांगात असल्याचे दिसले. त्यानंतर ११ दिवसांनी हे सर्व बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले. महिलेने यातील ३० हून अधिक कॅप्सुल्स ही पोटात लपवून ठेवल्या होत्या. हेरॉईनला दरव स्वरुपात करुन ते कॅप्सुलमध्ये भरण्यात आले होते. ११ दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंत डॉक्टरांनी तिच्या पोटातील ३० कॅप्सुल्स बाहेर काढल्या. प्रकृती बरी जाल्यानंतर तिला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले.
पोटात आणि गुप्तांगात ठेवलेल्या कॅप्सुलचे पॅकिंग या महिलेने चांगले केले होते, म्हणून ती बचावली. जर यातील एकही कॅप्सूल पोटातील अँसिडमुळे फुटली असती तर तिचा प्राण जाण्याची शक्यता होती. इतक्या मोठ्या संख्येने पोटात ड्रग्ज असणे हे धोकादायक होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.