जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच जिल्हा कोषागार कार्यालयातील ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्तीवेतनधारक व अभ्यागतांनी येणे टाळावे. असे आवाहन कोषागार अधिकारी प्रविण पंडीत यांनी केले आहे.
जिल्हा कोषागार कार्यालय, जळगाव यांच्यामार्फत २७ हजार सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी व कुटुंबियांना दरमहा ६० कोटी इतके निवृत्ती वेतन निवृत्तीवेतनधारकांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्यात जमा केले जाते. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व इतर कार्यालयीन खर्चाची देयके पारित करण्यात येतात. त्यामुळे कार्यालयात गर्दी वाढते.
तरी कोरोनाच्या प्रसारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शासकीय कार्यालयात अभ्यागतांना ३० एप्रिल, २०२१ पर्यंत प्रवेशास मनाई केलेली असल्याने अभ्यागतांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता संबंधितांनी आपल्या शंकांचे निरसन व इतर कामकाजाकरीता कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२५७- २२२९७१० व २२३३१९० आणि ई-मेल आयडी- to.jalgaon@zillamahakosh.in वर संपर्क साधावा. असे आवाहन प्रविण पंडीत, जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.