TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांचा वीजबिल प्रश्न १० दिवसात निकाली लावा : आम आदमी पार्टी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 7, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांचा (घरगुती व कृषिपंप) वीजबिल प्रश्न १० दिवसात निकाली लावा अन्यथा मुख्यमंत्री निवासस्थानी सत्याग्रह करावा लागणार आहे. असे निवेदन आम आदमी पार्टीने प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयात पाठविले आहे.

आम आदमी पार्टीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कोविड-१९ महामारी दरम्यान लॉकडाऊनमुळे राज्यात मार्च ते जून २०२० परंतु नागरिकांचा पूर्णपणे रोजगार बंद होतो. त्यानंतरही मागील दोन महिन्यात महामारी वाढत असल्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये लॉकडाउन चालू आहे. यामुळे आजपर्यंत जनता यामधून बाहेर पडलेली नाही. परंतु महावितरणकडून लॉकडाऊन काळात दि. १ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात आली आहे. राज्यातील जनतेजवळ पैसाच नसल्यामुळे विजेची मोठ्याप्रमाणात आलेली वीजबिल भरण्यास नागरिक असमर्थ आहेत. असे असतांना सरकारने बिल न भरू शकलेल्या जनतेला बिलावर व्याज लावत आहे, तर बिल न भरल्यास वीज खंडित करीत आहे, जे अन्यायकारक व अमानवीय आहे.

READ ALSO

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की, आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच काँग्रेस – राष्ट्रवादीच्या शपथनाम्याप्रमाणे औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक ठेवण्यासाठीचे आश्वासन देण्यात आले होते.

यापुढेही महामारी दरम्यान राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यानी वीजबिल सवलत देऊन दिवाळी गिफ्ट देण्याची घोषणा केली होती. तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी जनतेची वीज कापणार नसल्याची घोषणा केली होती. ह्या सर्व घटनांमुळे राज्यातील आर्थिक संकटात सापडलेली जनता आणखीच संभ्रमात पडली आहे. आणि आपण शिवाजी महाराजांना मानणारे असल्यामुळे आपल्या वचननाम्याप्रमाणे ३०% स्वस्त वीज करणार, ही अपेक्षा आहे.

आपणास पुन्हा हात जोडून विनंती आहे की, हा मुद्दा अधिक न ताणता आर्थिक कोंडी झालेल्या सामान्य घरगुती मीटर धारकांना आणि शेतकऱ्यांना तातडीने सवलत देवून आपली वचन पूर्ती करावी. तसेच राज्यातील शेतकरी सुद्धा लॉकडाउन आणि आसमानी संकटात अडकला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आनलेली योजना निकामी आहे, कुणीही शेतकरी आता रक्कम भरूच शकत नाही, त्यामुळे त्यांना पूर्ण माफी देने गरजेचे आहे.

दिल्ली मध्ये अरविंद केजरीवाल सरकार मागच्या सहा वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे, त्यामुळे आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या ९ महिन्यापासून सातत्याने आंदोलन करत आहे. आमच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत,

१. आपण जनतेला ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी.
२. कोविड दरम्यानचे मार्च ते ऑगस्ट या महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफी करावी,
३. मार्च २०२० ते मार्च २०२१ या काळातील थकीतवर कोणतेही व्याज आकारू नये.
४. शेतकऱ्यांना सरसकट विजबील माफी करावी,
५. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे,
६. दि. १ एप्रिल २०२० पासून केलेली वीज दर वाढ मागे घ्यावी.

आपण राज्यातील जनतेच्या सहनशक्तीचा अंत न पाहता वरील मागण्या येत्या १० दिवसात निकाली काढाव्यात, अन्यथा नाईलाजास्तव आम आदमी पार्टी राज्याचे प्रमुख या नात्याने वचनपूर्तीसाठी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर सोमवार दि. १९ एप्रिल २०२१ रोजी सत्याग्रह करावा लागणार आहे. असे निवेदन प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयात पाठविले. निवेदन देतांना जिल्हा सहसंयोजक विठ्ठलराव साळुंखे व जिल्हा सचिव रईस खान , राजमल पाटील उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
Next Post

'शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी देशमुखांनी २ कोटी मागितले' ; वाझेंचा खळबळजनक आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवडच्या सामाजिक कार्यकर्त्याने अवैध लाकुड वाहतूक करणारा ट्रक पकडून दिला वनविभागाच्या ताब्यात !

February 28, 2024

कोविड लस घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

March 10, 2021

चक्कर येवून नदीत कोसळल्याने तरूणीचा बुडून मृत्यू; जामनेर तालुक्यातील घटना

September 3, 2024

नांदेड येथील घरकुल वंचितांना मिळाली हक्काची जागा !

November 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group