भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिवणी येथे शनिवारी सकाळी पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. वडिलांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर जवळच असलेल्या शेडमध्ये १२ वर्षाचा मुलाचा मृतदेह आढळून आला. संजय साहेबराव चव्हाण (४८) आणि कौशिक संजय चव्हाण (१२) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत.
या संदर्भात अधिक असे की, शनिवारी सकाळी संजय हे निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तर जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचा मुलगा कौशिक हा बंगळीवर मृतावस्थेत आढळून आला. हा प्रकार कळताच ग्रामस्थ व नातेवाइकांनी त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पिता- पुत्रांना मृत घोषित केले. याबाबत भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पिता-पुत्राच्या मृत्यूचे नेमकं कारण समजू शकले नाही. परंतू गावासह परिसरात या घटनेबद्दल चर्चेला उधाण आलेले होते.