तुर्की (वृत्तसंस्था) भूकंपाच्या धक्क्याने तुर्की हादरली आहे. 7.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद झाली आहे. या शक्तीशाली भूकंपामुळे अनेक ठिकाणी घराची पडझड झाली आहे. ठिकठिकाणी बचावकार्य सुरू असून शेकडो लोक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Earthquake In Turkey )
तुर्कीमधील नूर्दगी भागापासूबन 23 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. तुर्कीमधील गाजियांटेपजवळ भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहे. रिश्टर स्केलवर 7.8 तीव्रतेची नोंद झाली आहे. तुर्कीसह सीरियामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सीरियामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे. रॉयटर्सच्या मते, हा भूकंप सुमारे एक मिनिट चालला. घराच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृत्यूचा आकडा हजारोंच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भूकंप स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:17 वाजता सुमारे 17.9 किमी खोलीवर झाला. यूएस जियोलॉजिकल सर्विसनं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दक्षिण तुर्कीमधील गॅझियानटेपजवळ 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.