नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ताजिकिस्तानमध्ये गुरूवारी दुपारी 3:02 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूंकपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
दुसरीकडे, अफगाणिस्तानमध्ये देखील आज (29 आॅक्टोबर) सकाळी पहाटे 1:19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूंकपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल एवढी होती. दरम्यान, बुधवारी (28 आॅक्टोबर) अफगाणिस्तानची राजधानी काबुलपासून 270 किमी उत्तर पूर्व भागात सांयकाळी 4:18 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल एवढी होती.