मलकापूर (प्रतिनिधी) उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधी, सॅनीटायझर व मास्क स्वखर्चाने खासदार रक्षाताई खडसे यांच्या कडून पुरविण्यात आल्या आहेत. तसेच कोविड सेंटर येथे कोरोना रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून उपलब्ध सुविधा व समस्यांची माहिती घेतली तसेच ऑक्सिजन सुविधेविषयी माहिती घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी यांना योग्य त्या सूचना केल्या.
तसेच रुग्णांसाठी असलेल्या खानावळीस खा. रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन भोजनाच्या दर्ज्याबद्दल माहिती घेतली. यावेळी माजी आमदार चैनसुख संचेती, गटनेते न.पा. विजयराज जाधव, मोहन शर्मा जिल्हा महामंत्री, तालुकाध्यक्ष संजय काजळे, सुरेशभाऊ संचेती, शंकरराव पाटील, जिल्हाध्यक्ष गुजरात समाज डॉ. योगेश पटणी, अशांतभाऊ वानखेडे, शहर अध्यक्ष मिलिंद डवले, जिल्हाध्यक्ष युवामोर्चा शिवराज जाधव, सूतगिरणी अध्यक्ष रामभाऊ झांबरे, शहर सरचिटणीस सतीष बोंबाटकर, महिला आघाडी शहराध्यक्ष अर्चनाताई शुक्ला, भाजयुमो शहराध्यक्ष शुभम बोबडे, दलित आघाडी अध्यक्ष कुणाल सावळे, शहर सरचिटणीस अमेय तोडकर, विनोद आकोटकार, संभाव जैन, अरविंद किनगे, बंडू बोंबाटकर, अभय पांडव, इकबाल खान, अब्दुल असीम चौधरी, अरुणसिंग राजपूत, भागवत पाटील, राजेंद्र जैस्वाल, शंकर पाटील इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच डॉ. अमोल नाफडे, डॉ. सुरेखा जैन, फार्मासिस्ट दीपक लहाने उपस्थित होते.