मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काल पाच ठिकाणी ईडीने झाडाझडती केल्यानंतर आज अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे.
आनिल देशमुख यांना आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिल देशमुखांच्या अडणीत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी देखमुखांच्या मुंबई आणि नागपुरातील घरावर ईडीनं छापेमारी केली होती. ईडीच्या धाडसत्रानंतर आता आनिल देशमुख यांना आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी ने अटक केली. दोघांनाही आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. शुक्रवारी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती.
ईडीने सचिन वाझे यांचा जबाब नोंदवला आहे. तळोजा जेलमध्ये जाऊन ईडीने हा जबाब घेतला. अनिल देशमुखांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी प्रकरणी हा जबाब नोंदवण्यात आला आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुखांनी परमबिर सिंग यांनी केलेल्या आरोपावर आपलं मत मांडलं आहे.