मुंबई (वृत्तसंस्था) शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वत: वर्षा गायकवाड यांनी ट्विटवरुन माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड यांनी ट्विटवर म्हटले आहे की, माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. पण माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी, सुरक्षित राहा, काळजी घ्या असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात १८ हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ३९२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाखांच्या वर पोहचला आहे.
नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान
मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या.— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) September 22, 2020