चोपडा (प्रतिनिधी) यावल रस्त्यावर असलेल्या देवयानी पेट्रोल पंपाजवळील गुळ नदीच्या पुलावर आयसर वाहनाने अचानक पेट घेतल्याने आयशर वाहनसह त्यातील घर सामान देखील जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वन विभागाचे आर.एफ.ओ. यांची बदली झाल्यामुळे घर सामान त्यांच्या बदली झालेल्या ठिकाणी घेऊन जात होते. आयसर वाहन क्रमांक MH 48 AF 8985 या वाहनाने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण घर सामान जळून खाक झाले आहे. वाहन पेट घेत असल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने ड्रायव्हरने पुलाच्या कडेला गाडी थांबवून स्वतःचा व जवळ बसलेल्या एका मुलाचे प्राण वाचवले. आग एवढी भयंकर होती की, संपूर्ण घराच्या समानासह वाहन जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही बाजूने ट्राफिकच्या लांबच लांब लागलेल्या रांगा नियंत्रणात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत आपले कामकाज बाजविले.