जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या अल्पसंख्यांक आघाडीतर्फे वसंत स्मृती भाजपा जिल्हा कार्यालय येथे जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा शहराचे लाडके आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा) व महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत भाजपा जळगाव महानगर अल्पसंख्यांक मोर्चा तर्फे ईदमिलन शिरखुर्मा च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी शहराचे लाडके आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते उपस्थितांना शिरखुर्मा वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी सर्वानी एकत्रित येऊन काम करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीतर्फे केले. तसेच भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष यांनी सामाजिक एकता विषयी मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा चिटणीस भगतसिंग निकम, राजेंद्र मराठे, नगरसेवक किशोर चौधरी, सुरेश सोनवणे, महानगर नगर अल्पसंख्यांक अध्यक्ष गुडडु भाऊ पठाण, मंडल अध्यक्ष विनोद महाजन, जिल्हा कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, गणेश माळी, जनजाती मोर्चा अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, सुनील काळे, चेतन तिवारी, मोहम्मदनुर,शेख प्रशांत सावंत, सतीश भावसार, स्वप्निल साखळीकर, अफसर शेख, वसीम शेख, इद्रिस शेख, तोसिफ शेख, आरिफ खान, शब्बीर शेख, रहीम तबोली शेजान शेख, शाहिद खान आदी उपस्थित होते. जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.