TheClearNews.Com
Monday, July 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी साधला खरशेत ग्रामस्थांशी संवाद

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ घेतली दखल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) “साहेब, आमच्या माय भगिनीची व्यथा तुम्ही जाणली आणि २४ तासांच्या आत पाणी आणण्यासाठी असणारा लोखंडी पूल तयार झाला. जणू आमचा मरणाकडे जाणारा रस्ता थांबला…” अशा शब्दांत शेंद्रीपाडा.. खरशेतमधील ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर तेवढ्याच संवेदनशीलतेने उत्तर देत, “हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे सरकार आहे. त्याच्याप्रती असणारी आमची बांधिलकी कायम राहील” असा विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. जलजीवन मिशन अंतर्गत खरशेत आणि लगतच्या ९ पाड्यांना जून महिन्या अखेरपर्यंत त्यांच्या घरापर्यंत नळाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील खरशेत (ता. त्र्यंबकेश्वर) येथील महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी कसरत काही माध्यमातून समोर आली होती. त्याची तात्काळ दखल घेत पर्यटनमंत्री ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांनी, तेथे पाण्यासाठी जाणाऱ्या महिलांना रस्ता तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची दखल घेत यंत्रणांनी केवळ २४ तासांत तेथे लोखंडी पूल उभारुन व्यवस्था केली होती. त्याचबरोबर, हे गाव जल जीवन मिशन मध्ये ही समाविष्ट आहे. त्या अनुषंगाने आज ग्रामपंचायत खरशेत येथील ग्रामस्थांनी मंत्री ठाकरे आणि मंत्री पाटील यांनी ऑनलाईन संवाद साधला. राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जलजीवन मिशन कक्षाचे प्रमुख ह्षीकेश यशोद यांच्यासह नाशिकहून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, इतर वरिष्ठ अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

जलजीवन मिशन अंतर्गत खरशेत ग्रामपंचायत येथे विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या असून खरशेत आणि सावरपाडा आणि आसपासच्या वाड्यांवर नळपाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पूर्ण होऊन कामांना सुरुवात केली जाणार आहे. या योजनेच्या पूर्णत्वानंतर खऱ्या अर्थाने खरशेत, सावरपाडा आणि आसपासच्या पाड्यांवरील पाण्यासाठीची महिलांची होणारी वणवण थांबणार आहे.

यावेळी पर्यटनमंत्री ठाकरे यांनीही ग्रामस्थांशी साधलेल्या संवादात जनतेची सेवा ही महत्वाची मानून काम करीत असल्याचे सांगितले. पाणी हे जीवन आहे. त्याच्यासाठीचा संघर्ष कमी करणे, त्यासाठी काम करणे महत्वाचे आहे. आमचे सरकार हे काम करीत असल्याचे ते म्हणाले.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील यांनीही, जलजीवन मिशनच्या माध्यमातून टंचाई जाणवणाऱ्या भागात पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले. खरशेतची व्यथा जाणून २४ तासांच्या आत तेथे यंत्रणेने लोखंडी पूल उभारला. यापुढील काळात प्रत्येकाच्या घरी नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, असे सांगितले.

जलजीवन मिशन अंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनांमध्ये खरशेत व ५ वाड्या (खरशेत, जांभुलपाडा, फणसपाडा, शेंद्रीपाडा, पांगुळघर, कसोलीपाडा) नळपाणीपुरवठा आणि सावरपाडा व ३ वाड्या (सावरपाडा, सादडपाडा, वालीपाडा, मुरुमहट्टी) यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत ही योजना पूर्ण केली जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #AdityaThackeray#GulabraoPatil

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

काय सांगता? : कोरोना लस घेतल्यानंतर अपघातात वाचा गेलेला माणूस बोलू लागला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खासदार संजय राऊत यांची महापौर-उपमहापौरांनी घेतली भेट

June 1, 2021

संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान ! कोरोनाने मेलेली माणसं जगण्याच्या लायक नव्हती !

April 8, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ डिसेंबर २०२४ !

December 21, 2024

क्रूझ ड्रग्ज प्रकरण : एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर

October 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group