एरंडोल (प्रतिनिधी) शहरातील राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालकासह महिलेचा जागीच मृत्यू झालेय. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
यासंदर्भात अधिक असे की, शनिवार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एरंडोल शहरपासून जवळ असलेल्या हॉटेल कृष्णा जवळ कार (एमएच १९ सीव्ही ७७१७) आणि कंटेनर (एमएच ४६ बीबी ८५३२) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारचालक प्रकाशचंद राजमलजी बागरेचा (रा. दुर्वाकुर पार्क, वाघुळदे नगर, जळगाव) यांच्यासह एक महिला कमलबाई (पूर्ण नाव माहित नाही) जागीच ठार झाले आहे. तर पाच जण गंभीर जखमी आहेत. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. तर इतर तीन जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.