जळगाव (प्रतिनिधी) वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे ८ द्वारे उघडण्यात आली आहे व त्या द्वारे २७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे, तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये, असे आव्हान करण्यात आले आहे.
जिल्ह्यात काही भागात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ४ दरवाजे २० सें.मी. ने उघडण्यात आले आहे. धरणातून २७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. यानंतर आणखी चार दरवाजे उघडण्यात आले आहे. आठ दरवाजे उघडण्यात आल्याने धरणातून १३ हजार ३७७ क्युसेक विसर्ग होत आहे. यामुळे नदीला पुर आला असून कोणीही नदीपात्राजवळ जाऊ नये, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.