TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

कर्तव्य सांभाळून नाट्यकला जोपासणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांच्याकडून कौतुक

vijay waghmare by vijay waghmare
June 21, 2025
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी )दि. २१ जुन २०२५ :- नाटक अनेक कलांचा संगम आसते. अभिनय, संगीत, आशय, रंग आणि वेषभूषा त्यात सामावलेल्या आहेत. ‘रिटेक’ ची कुठलीही व्यवस्था नसलेले नाटक हे इतर माध्यमांच्या तुलनेत अवघड आहे. तरीही विजेसारख्या अत्यंत कठीण आणि अतिमहत्त्वाच्या क्षेत्रात आपले कर्तव्य बजावून महावितरणचे कर्मचारी नाट्यकला जोपासतात. याचा अभिमान वाटतो. अशा शब्दात कौतुक करीत महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी स्पर्धेत सहभागी नाट्यकलावंतांचा सन्मान केला.

जळगाव शहरात महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत असणाऱ्या परिमंडलाच्या नाट्यस्पर्धा संपन्न झाल्या. शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात झालेल्या स्पर्धेत जळगाव परिमंडलाचे (झेंडा रोविला), भांडूपचे (कुसुम मनोहर लेले), रत्नागिरीचे (आवर्त), नाशिकचे (दानव), सांघिक कार्यालय मुंबईचे (मोक्षदाह) व कल्याण परिमंडलाचे (टर्निंग पॉईंट), ही सहा नाटके सादर झाली.

READ ALSO

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शुक्रवार दिनांक २० जून रोजी स्पर्धेचा पारितोषिक वितरणाने समारोप झाला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार उपस्थित होते. त्यांच्या समवेत व्यासपीठावर मुख्यालयातील चाचणी विभागाचे मुख्य अभियंता डॉ. मनिष वाठ, जळगावचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, अधीक्षक अभियंता विनोद पाटील, निरज वैरागडे, मनोज विश्वासे, नाट्य परीक्षक प्राचार्य डॉ. शशिकांत चौधरी, सौ. अर्चना राज कुबेर, सह मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी राम गोपाल आहीर, सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आय. ए. मुलाणी यांनी केले.

प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र पवार यांच्या हस्ते नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्या संघ आणि नाट्यकलावंतांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेत अनिरुद्ध रांजेकर लिखित ‘ आवर्त ‘ हे नाटक प्रथम पुरस्काराने सन्मानित झाले. रत्नागिरी परिमंडळातर्फे ते सादर करण्यात आले होते. नाटकाची निर्मिती अनिल डोये यांची होती. निर्मिती मधील दुसरे पारितोषिक संजय पाटील निर्मित भांडुपच्या ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकास मिळाले.

दिग्दर्शनासाठी प्रथम राजू पुणेकर यांना ‘आवर्त’ या रत्नागिरीच्या नाटकास तर द्वितीय पुरस्कार भांडूपच्या ‘कुसुम मनोहर लेले’ साठी चंद्रमणी मिश्रा यांना मिळाले.

अभिनयात पुरुष प्रवर्गात दुर्गेश जगताप (रत्नागिरी – आवर्त), प्रथम तर द्वितीय देववृत्त पवार यांना (भांडूप – कुसुम मनोहर लेले) मिळाले. स्री अभिनयासाठी प्रथम रूपाली पाटील (भांडूप – कुसुम मनोहर लेले) तर द्वितीय पारितोषिक श्रद्धा मुळे (रत्नागिरी – आवर्त) यांना देण्यात आली.

नेपथ्यसाठी प्रथम राजेंद्र जाधव (रत्नागिरी – आवर्त), तर द्वितीय श्रीधर शिंदे (सांघिक कार्यालय मुंबई – मोक्षदाह), यांना देण्यात आले.

प्रकाश योजनेसाठी प्रथम प्रणाली निमजे (रत्नागिरी – आवर्त), तर द्वितीय संदीप संकपाळ, (भांडुप – कुसुम मनोहर लेले) यांना देण्यात आले.

संगीत योजनेसाठी प्रथम नितीन देसाई (रत्नागिरी – आवर्त), तर व्दितीय रवींद्र चौधरी (जळगाव – झेंडा रोविला) यांना देण्यात आले.

रंग व वेशभूषेसाठी प्रथम पारितोषीक आशिष कासार (जळगाव – झेंडा रोविला) तर द्वितीय पुरस्कार श्रीमती नमिता गजधर (भांडूप – कुसुम मनोहर लेले) यांना देण्यात आले.

उत्तेजनार्थ मध्ये देववृत्त पवार (भांडूप – कुसुम मनोहर लेले) सचिन पुरव (नाशिक – दानव), अनुराधा गोखले (रत्नागिरी – आवर्त), विजेंद्र भोवड (सांघिक कार्यालय मुंबई – मोक्षदाह), सायली संन्याशी (कल्याण परिमंडळ – टर्निंग पॉईंट), प्रणिता शिंदे (जळगाव – झेंडा रोविला) यांना देण्यात आले.

कर्मचारी लेखन प्रवर्गातून ग्यानेश पाटील यांना टर्निंग पॉईंट या नाटकासाठी पारितोषिक देण्यात आले. तर बालकलाकार प्रवर्गातून आर्णव बनसोडे (कल्याण – टर्निंग पॉईंट), नित्यश्री पाटील (कल्याण – टर्निंग पॉईंट), पूर्वा जाधव (जळगाव – झेंडा रोविला) व स्वरांगी साळीस (जळगाव – झेंडा रोविला) साठी देण्यात आले.

कॅप्शन – विज्येत्या संघासोबत घेण्यात आलेल्या छायाचित्रात मान्यवर व नाट्यकलावंत.

प्रति,
मा.संपादक / प्रतिनिधी
कृपया उपरोक्त प्रसिध्दी पत्रकास आपल्या वृत्तपत्रातून प्रसिध्दी द्यावी ही विनंती.

जनसंपर्क अधिकारी
परिमंडल कार्यालय, जळगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRatnagiri's 'Avarta' first in Mahavitaran's drama competition

Related Posts

जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
Next Post

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनोरे येथील शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू !

February 10, 2023

भरधाव अज्ञात वाहनाने रेल्वे पोलिसाला चिरडले !

September 6, 2023

Gold-Silver Prices Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने महागले ; जाणून घ्या..आजचा दर !

February 25, 2022

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अजून ८४ कोटींच्या मदतीचा बुस्टर डोस…

November 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group