पुणे प्रतिनिधी । पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे.
पहिला अपघात सहजपूर गावच्या हद्दीत रविवारी (दि. २०) रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान टँकर व हुंडाई असेंट कार यांच्या अपघातात दोन जण ठार झाले. तर आज (दि.२१) रोजी यवत गावच्या हद्दीत पहाटे ३:३० वाजण्याच्या उभ्या कंटेरला संट्रो कार धडकून कारमधील शोभा शरणगौडा पाटील (वय ३८ वर्षे), अनिता सिद्धेश्वर बर्डे (वय ४० वर्षे), सिद्धेश्वर चंद्रकांत बर्डे (वय ५५ वर्षे), श्वेता शिद्धेश्वर बर्डे ( वय २३ वर्षे सर्व रा. कोंढवा, पुणे) तर संतोष मल्लिनाथ पाटील (वय ३८ वर्षे रा. भोसरी, इंद्राईणीनगर, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत. तर तिसरा अपघात वाखारी (ता. दौंड) गावच्या हद्दीत झाला असून अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तीन अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून टँकर व कंटेनर चालकाविरोधात यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.