बोदवड (प्रतिनिधी) शहरातील गांधी चौकात प्रभू हरिओम जैस्वाल व तरुण मित्र मंडळाने आयोजित केलेली प्रभूची पस्तीस फुटवरील अकरा हजारांची दहीहंडी तीन तासाच्या अथक प्रयत्नांनी शहरातील एकलव्यच्या गोविंदा पथकाने साडेआठ वाजता फोडली.
शहरातील गांधी चौकात प्रभू ची दहीहंडी दुपारी चार वाजता चाळीस फुटावर लावण्यात आली होती. त्यासाठी शहरातील तीन गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. त्यात नरसिंहा गोविंदा मंडळ,महाकाल गोविंदा मंडळ,एकलव्य गोविंदा मंडळ,या पथकांना अमंत्रातीत करण्यात आले होते. त्यात पहिल्यांदा सलामी देण्यात आली, त्यानंतर सुरू असलेल्या थर लावण्यात अपयश येत असल्याने बक्षिसाची रक्कम वाढत जाऊन सदर दहीहंडी एक्क्यांनव ९१ हजारची झाली. परंतू तरीही यश मिळत नसल्याने सदर दहीहंडी पाच फूट कमी करत ३५ फुटावर लावण्यात आली. यावेळी मात्र, एकलव्य गोविंदा पथकाने सदर दहीहंडी रात्री साडेआठ वाजता फोडली.
दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी शहरात गांधी चौकात मोठी गर्दी झाली होती. यावेळी हंडी फोडण्याच्या प्रयत्नातही काही गोविंदा हात पायांना दुखापत होऊनजखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. या वेळी आयोजक प्रभू जैस्वाल, अक्षय खत्री,वासू माळी,मयूर बडगुजर, राहुल शर्मा, अजय पाटील,सुरज पाटील,देवेश माळी यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.