मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद वाईट पद्धतीने मिळवले. नरेंद्र मोदींसोबतही ते तुलना करतील आणि पंतप्रधानपद मागतील लालसा आणि चटक त्यांना आहे. ते सत्ता पिपासू आहेत अशी कडवट टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. सामनाचे संपादक आणि शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ‘प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान… उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे. मी मुख्यमंत्री झालो तर प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा. आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते. गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता, असं ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांची क्लिपचं काय?
या क्लिपबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री होईल असं मी कधीही बोललो नव्हतो, तेव्हा मला एक आव्हान स्वीकारावं लागलं होतं. या सगळ्या गोष्टी ठरवल्यानंतर नाकारण्यात आल्या. त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हावं लागलं. मी मुख्यमंत्री झालो, आता मी होऊन गेलेला आहे, पण प्रॉब्लेम काय तुम्हाला? ज्या बाळासाहेबांचा फोटो लावताय त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवलं? इतकी अडीच वर्ष किंवा त्याच्या आधी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्याची क्लिप वायरल होत आहे. तेव्हा भाजप कसा अत्याचार करतो आहे हे सांगत राजीनामा दिला होता, ही क्लिप आहे, माझ्या समोर त्यांनी राजीनामा दिला होता आणि ते स्वतः बोलत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्या क्लिपचाही हिशोब काढला आहे.
भाजप त्रास देतंय सांगणारे हेच होते
भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. २०१९ मध्ये भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केला आहे.
कर्माने मरु द्या, धर्माने मारु नका
ठाकरे म्हणाले, संजय राऊतांवर आरोप केले जात आहेत त्यांना भाजपमध्ये नेण्यासाठीच हा प्रयत्न केला जात आहे. बाळासाहेब म्हणायचे की, कर्माने मरणाऱ्याला धर्माने मारु नका. भाजपने शत्रुत्व वाढवू नये. सरत्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी वचन बाळासाहेबांना दिला त्यामुळेच हे पद हवे होते हे भाजपने लक्षात घ्यावे. मी मुख्यमंत्री होऊन गेलो त्यामुळे तुम्हाला समस्या का आहेत, भाजप शिवसैनिकांवर अत्याचार करतो ती क्लिप आपण पाहीली नाही का.. बंडखोरांना लालसा आहे, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद वाईट पद्धतीने मिळवले. नरेंद्रमोदींसोबतही तुलना करतील आणि पंतप्रधानपद मागतील लालसा आणि चटक त्यांना आहे.