मुंबई/जळगाव, दि. ९ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पाणीपुवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी त्यांचा भव्य सत्कार केला. या सोहळ्यात कार्यकर्त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
“संघर्षातून उभा राहिलेला खरा जननेता !”
यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कणखर आणि निर्णयक्षम नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. “एकनाथ शिंदे हे केवळ राजकीय नेते नसून ते सामान्य जनतेचे आधारस्तंभ आहेत. नेतृत्व, जिद्द आणि धैर्याचे प्रतीक म्हणजेच एकनाथजी शिंदे. संघर्षातून नेतृत्व करणारा, बाळासाहेबांची खरी शिवसेना जपणारा, गरिबांचा वाली आणि कार्यकर्त्यांच्या आधारावर उभा असणारा नेता म्हणजेच बाळासाहेबांचा वाघ आणि आनंद दिघे साहेबांचा शेर – एकनाथ शिंदे आहेत. असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शिवसैनिकांचा व लाडक्या बहिणींचा खरा आधारवड
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे हे राज्यातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत. त्यांनी केवळ आश्वासन दिली नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे तमाम जनतेचा विश्वास त्यांच्या नेतृत्वावर आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मराठी स्वाभिमान, हिंदुत्व आणि विकासाचा विचार शिंदे साहेब पुढे नेत आहेत. त्यांनी शिवसैनिकांचा सन्मान आणि जनतेच्या हितासाठी मोठमोठे निर्णय घेतले आहेत. खऱ्या अर्थाने, शिवसैनिकांचा व लाडक्या बहिणींचा आधारवड म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत.
शेरो-शायरीतून दिल्या प्रेरणादायी शुभेच्छा
मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत एकनाथ शिंदे यांना शेरो-शायरीच्या माध्यमातून दमदार शुभेच्छा दिल्या –
“जो वादों पे नही, इरादों पे चलते हैं,
ऐसे नेता कभी हराये नही जाते हैं !
महाराष्ट्र में बुलंदी से नाम गूंजे,
वही एकनाथ शिंदे, जो दिलों में बस जाते हैं !
याप्रसंगी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे यांच्यासह विविध मान्यवर आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.